माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी खलिस्तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले यास ‘हुतात्मा’ ठरवले !

आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा !

नवी देहली – भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांवर खलिस्तानी आतंकवादी जर्नल सिंह भिंद्रनवाले याच्या मृत्यूदिनाच्या निमित्ताने त्याला श्रद्धांजली अर्पण करत त्याला ‘हुतात्मा’ म्हटले आहे. यामुळे हरभजनसिंह यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका केली जात आहे. यावर हरभजनसिंह यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हरभजनसिंह यांनी वरील ‘पोस्ट’ प्रसारित करतांना ‘अभिमानाने जगा आणि धर्मासाठी मरा’ असे ‘स्टेट्स’ ठेवले होते.