प्रेमभाव असणार्‍या आणि सतत सकारात्मक राहून तळमळीने सेवा करणार्‍या मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विद्या कामेरकर (वय ५० वर्षे) !

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीगुरूंवरील श्रद्धा ढळू न देता, सतत सकारात्मक राहून सेवाभावी वृत्तीने सेवा करणार्‍या गिरगाव (मुंबई) येथील साधिका सौ. विद्या शामसुंदर कामेरकर (वय ५० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ३१ ऑगस्ट २०२० या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनी घोषित केले. संत आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सौ. विद्या कामेरकर

१. सकारात्मकता

​एखादी सेवा ‘मला जमणार नाही’, असे त्या कधीच म्हणत नाहीत. त्यांना कधी तातडीच्या सेवेसाठी विचारल्यावर त्या सकारात्मक राहून सेवेत साहाय्य करतात.

२. प्रेमभाव

माझी काकूंशी पूर्वीपासून ओळख आहे. माझ्या विवाहापूर्वी मी सी.एस्.टी. येथे नोकरीला जायचे. काकूंचे घर तिथून जवळ होते. मी नोकरीची वेळ संपल्यावर तेथूनच काकूंच्या घरी जायचे. मी घरी येण्याआधी काकू माझ्यासाठी काहीतरी खाऊ बनवून ठेवायच्या आणि मी त्यांच्या घरी गेल्यावर मला द्यायच्या. त्यानंतर त्यांच्या समवेत सेवेसाठी कुलाब्याला जायचे. तेव्हा मी नवीन असल्याने मला प्रसारातील काही कळत नव्हते. काकूंनी मला प्रत्येक गोष्ट प्रेमाने शिकवली.

३. शिकण्याची वृत्ती

एखाद्या साधकाला त्याची चूक सांगताना त्यांच्या मनात पूर्वग्रह नसतो. ‘त्या साधकाला मी कसे साहाय्य करू ?’, असे त्या दायित्व असलेल्या साधकाला शिकण्याच्या स्थितीत राहून विचारतात आणि त्यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न करतात.

४. सेवेची तळमळ

अ. काकू गिरगाव येथे प्रसाराची सेवा करतात. तेथे साधकसंख्या अल्प आहे. त्यामुळे त्या प्रसारसेवेसह अन्य सेवाही करतात. त्यांना कोणतीही सेवा सांगितली, तरी त्या मनापासून आणि आनंदाने स्वीकारतात अन् ती सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. एका गुरुपौर्णिमेला त्यांना चप्पल व्यवस्था करण्याची सेवा दिली होती. साधकांच्या साहाय्याने त्यांनी ती सेवा नियोजनबद्ध आणि भावपूर्ण केली.

आ. दळणवळणबंदी पूर्वी आझाद मैदानात राष्ट्र-धर्म विषयक विविध आंदोलने होत असत. प्रत्येक आंदोलनाच्या सेवेत त्या उत्साहाने सहभागी होत आणि त्यांना दिलेली सेवा मनापासून आणि तत्परतेने करत.

५. ‘देवच सेवा करवून घेतो. तो मला साहाय्य करण्यासाठी कुणाला तरी नेहमी पाठवतो’, असा त्यांचा भाव असतो.’

– सौ. प्रीती गुरव, मुंबई (१८.८.२०२०)

पू. (सौ.) संगीता जाधव यांना सौ. विद्या कामेरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. (सौ.) संगीता जाधव

१. ‘स्वतःमुळे इतरांना त्रास होऊ नये’, याची काकू सतत काळजी घेतात.

२. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणे

एकदा त्यांच्यावर आलेल्या कठीण परिस्थितीतही त्यांची गुरुदेवांवरील श्रद्धा डळमळीत झाली नाही. त्यांना कुणाकडून अपेक्षा नसते. प्रत्येक प्रसंगात त्या प्रार्थना करून गुरुदेवांचे साहाय्य घेतात. त्यामुळे त्यांना बळ मिळते. त्या पहिल्यापासून भगवंताचे निर्गुण तत्त्व अनुभवत आहेत.

३. सौ. काकू रुग्णाईत असतांना ‘परात्पर गुरुदेव त्यांची काळजी घेत आहेत’, याविषयी आलेली अनुभूती  

एकदा काकूंनी लघुसंदेश पाठवून मला कळवले, ‘मला अस्वस्थ वाटत असून ताप आला आहे; पण दिवसभरात आधुनिक वैद्य आले नाहीत.’ त्या वेळी मी त्यांना नामजपादी उपाय सांगितले. त्यानंतर मी अन्य सेवा करण्यात व्यस्त झाले. दुपारी काही घंट्यांनी मला काकूंची आठवण झाली. ‘काकू कशा असतील ? त्यांचा त्रास न्यून झाला आहे का ?’, असा विचार करून मी सूक्ष्मातून काकूंना अनुभवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ‘काकूंच्या जवळ परात्पर गुरु डॉ. आठवले बसले आहेत. ते काकूंसाठी नामजपादी उपाय करत आहेत आणि त्यांना औषध देत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. तेव्हा ‘प्रत्यक्ष गुरुदेव काकूंच्या जवळ असल्याने त्या व्यवस्थितच असणार’, असा विचार माझा मनात झाला. मी काकूंना दूरभाष करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा काकू म्हणाल्या, ‘‘आताच आधुनिक वैद्य आले होते. त्यांनी औषध दिल्यामुळे मला आता बरे वाटत आहे.’’ हे ऐकून माझी भावजागृती झाली.

​‘भाव आणि कृतज्ञता असेल, तरच आपण आपत्काळात तरून जाऊ शकतो आणि गुरुदेव साधकांना कसे साहाय्य करतात ?’, हे शिकायला मिळून माझी भावजागृती झाली.’

– (पू.) सौ. संगीता जाधव, ठाणे (१८.८.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मनआणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्याज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांनाडोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकटसर्वांनाच येतील असे नाही. – संपादक