कडाक्याच्या थंडीमुळे प्रकृती बिघडल्याने चीनने लडाख सीमेवर नियुक्त असणार्‍या ९० टक्के सैनिकांना परत बोलावले !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बीजिंग (चीन) – कडाक्याच्या थंडीमुळे प्रकृती बिघडल्याने लडाख सीमेवर नियुक्त असणार्‍या ९० टक्के चिनी सैनिकांना परत बोलावण्यात आले आहे. गेल्या वर्षी गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर चीनने येथे ५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात केले होते. परत बोलावलेल्या सैनिकांच्या जागी अन्य ठिकाणी नियुक्त असलेल्या सैनिकांना लडाख सीमेवर आणण्यात आले आहे. नवीन आलेल्या सैनिकांनाही येथील थंडीशी जुळवून घेणे जड जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच कारणामुळे पँगाँग तलावाच्या ठिकाणीही तैनात असतांना चीन त्याचे टेकड्यांवरील सैनिक प्रतिदिन पालटत होता. या सैनिकांच्या हालचाली फार मंदावल्या होत्या.

चीनच्या सैनिकांची ही स्थिती असतांना दुसरीकडे भारतीय सैन्याने गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे सैनिक लडाख सीमेवर मोठ्या संख्येने तैनात केले आहेत. हेे सैनिक आजही तेथे ठाण मांडून आहेत.