स्वार्थापोटी युवा पिढीला अमली पदार्थांचा रतीब देऊन मृत्यूच्या खाईत लोटणार्‍यांना धडा शिकवा !

१. अमली पदार्थांच्या आहारी जाणार्‍या युवा पिढीला बाहेर काढावे, असे अभिनेते आणि शासनकर्ते यांना वाटत नसणे

प्रतिकात्मक छायाचित्र

अभिनेते आणि शासनकर्ते यांनी पोलिओच्या निर्मूलनासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करून ते अभियान यशस्वी केले; मात्र आज आमच्या देशातील युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. ‘या युवा पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करायला हवेत’, असे त्यांना वाटत नाही, हे या पिढीचे दुर्भाग्य आहे.

२. ड्रग्ज माफिया चित्रपटांच्या निर्मितीसाठी पैसे देत असल्याने अभिनेते अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या युवा पिढीसाठी लढू न शकणे

श्री. व्यंकटेश अय्यंगार

उत्तरप्रदेशमध्ये लाखो तरुण अमली पदार्थांच्या सेवनामुळे (‘ड्रग्ज जिहाद’मुळे) मृत्यूमुखी पडत आहेत. एकही अभिनेता हे थांबवण्यासाठी का पुढे येत नाही, याचे कारण जाणून घेतले असता कळले की, या अमली पदार्थांचे विक्रेतेच (‘ड्रग्ज माफिये’च) चित्रपटांच्या निर्मितीसाठी लागणारा निधी पुरवतात. त्यामुळे अभिनेते या अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या युवा पिढीसाठी (‘ड्रग्ज जिहाद’साठी) लढू शकत नाहीत. दुसरीकडे आजच्या युवा पिढीला योग्य दिशा देणारे कुणीही नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

३. युवा पिढी स्वतःच्याच पैशाने विष विकत घेऊन आत्महत्या करत असणे

याचा अर्थ असा की, युवा पिढीच्या पैशावर या माफियांचा व्यवसाय चालू आहे. एका दृष्टीने पाहिले असता ही युवा पिढी स्वतःच्याच पैशाने विष विकत घेते आणि आत्महत्या करत आहे.

– श्री. व्यंकटेश अय्यंगार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०१६)