कोल्हापूर – दळवळण बंदीचे निर्बंध शिथिल होत असतांना राज्य परिवहन महामंडळानेही कोल्हापूर ते पुणे बस सेवा काहीअंशी चालू केली आहे. सध्या कोल्हापूर-शिवाजीनगर, कोल्हापूर-स्वारगेट अशा फेर्या चालू करण्यात आल्या आहेत. ५० टक्के भारमान नियमाचे पालन करत एस्.टी. मध्ये २० प्रवासी घेऊन गाडी चालवण्यात येत आहे. अजूनही गाडी सुटण्याच्या वेळा निश्चित नाहीत; पण १ ते दीड घंटा अशा अंतराने एक बस सुटेल, असे नियोजन वाहतूक शाखेकडून केले जात आहे. लवकरच अन्य मार्गांवरही एस्.टी.च्या फेर्या चालू करण्यात येणार आहेत.