कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर छुप्या पद्धतीने होणारा एस्.टी.च्या खासगीकरणाचा डाव उधळून लावू ! – नितीन शिंदे, माजी आमदार

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मिरज – एस्.टी. कर्मचार्‍यांना एकत्रित करून कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरोधात त्यांच्या प्रश्‍नांविषयी वेळोवेळी आंदोलन केले जाईल. राज्य परिवहन महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणी असणार्‍या कोट्यवधी मूल्यांच्या जागा आणि मालमत्ता विकण्याचे षड्यंत्र चालू आहे. तरी कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर छुप्या पद्धतीने होणारा एस्.टी.च्या खासगीकरणाचा डाव उधळून लावू, अशी चेतावणी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी दिली. मिरज आगारातील वाहतूक नियंत्रक डी.डी. पटेल हे सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी श्री. शिंदे बोलत होते.

या वेळी डी.पी. बनसोडे, राजू खैरमोडे, संजय यादव यांसह अन्य उपस्थित होते. या प्रसंगी अन्य सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचाही सत्कार करण्यात आला.