कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही, ७ ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प नियोजित ! – जिल्हाधिकारी


कोल्हापूर – सध्या जिल्ह्यात कोल्हापूर ऑक्सिजनकडून २५ मेट्रिक टन, बेल्लारी येथून १२ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख पुरवठादारांकडून वायूरूपात ऑक्सिजनचा पुरवठा चालू आहे. याशिवाय पुणे येथील आयनॉक्स, तायो निप्पोन, या मोठ्या आस्थापनांकडून ऑक्सिजनचा थेट पुरवठा होत आहे. त्यामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. जिल्ह्यात पुढील काळात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यांसाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील धर्तीवर ७ ठिकाणी नव्याने ऑक्सिजन जनरेटर आणि वायूरूपात ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरण्याचे प्रकल्प नियोजित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.