सांगली महापालिकेचे १२० खाटांचे कोरोना रुग्णालय २४ एप्रिलपासून चालू होणार ! – नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त

सांगली महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे कोरोना रुग्णालय

सांगली, २३ एप्रिल – मिरज शासकीय तंत्रनिकेतन येथे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे १२० खाटांचे कोरोना रुग्णालय चालू होत आहे. आदिसागर रुग्णालयाप्रमाणे रुग्णांसाठी विनामूल्य सेवा देण्यात येणार असून यात २४ घंटे रुग्णसेवा देण्यात येणार आहे. येथे भरती होणार्‍या रुग्णांना सकाळचा अल्पाहार, भोजन, तसेच औषधे महापालिका पुरवणार आहे, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. आयुक्तांनी मिरज तंत्रनिकेतन येथे कोरोना रुग्णालयाच्या सिद्धतेचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.

या संदर्भात आयुक्त म्हणाले, येथे भरती होणार्‍या रुग्णाला लागणारे अन्य साहित्यही महापालिका पुरवणार आहे. या रुग्णालयात ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे अशाच रुग्णांना भरती करून घेतले जाणार आहे. तसेच ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही त्यांना शेजारील इमारतीमध्ये पाठवले जाणार आहे.