ब्रेक दि चेन’ अंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीसाठी सुधारित आदेश जारी !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू !

पुणे – राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. पुण्यात दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांमुळे आरोग्ययंत्रणेवरचाही ताण वाढत आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेने ब्रेक दि चेन अंतर्गत मनपा हद्दीसाठी पुढील प्रमाणे सुधारित आदेश जारी केला आहे.

१. ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या आस्थापनांना १०० प्रतिशत पुरवठा हा वैद्यकीय कारणासाठीच करण्याचे आदेश.

२. ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे यांची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे.

३. घरपोच औषध पोचवणारे कर्मचारी तसेच हॉटेल, रेस्टॉरंट मधील कर्मचारी, घरपोच सुविधा देणारे, खासगी वाहतूक करणारे वाहन चालक-मालक, वर्तमानपत्र, मासिके, साप्ताहिके यांची छपाई आणि वितरण करणारे, घरगुती काम करणारे कामगार, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस आणि नर्स यांनी लसीकरण करून घ्यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

४. खानावळी पार्सल सेवेसाठी (सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत) मद्य विक्रीची दुकाने होम डिलिव्हरी साठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत, तर चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत चालू राहतील. सदर नियमावली पुढील आदेशापर्यंत लागू असेल.