संत म्हणजे ईश्‍वराचे सगुण रूप ।

श्रीमती स्मिता नवलकर

‘२८.११.२०२० या दिवशी देवद आश्रमातील ध्यानमंदिरात मी नामजप करत होते. तेव्हा ‘आम्हा साधकांकडून साधनेसाठी तुटपुंजे प्रयत्न होत असले, तरी परात्पर गुरु डॉक्टर आणि आश्रमातील संत यांचे अस्तित्व अन् आश्रमातील चैतन्य यांमुळेच साधकांचे रक्षण होत आहे’, याची जाणीव मला झाली. त्या प्रसंगी माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होतांना मला ‘संत’ या शब्दाची गुणवैशिष्ट्ये सांगणारी पुढील कविता सुचली. 

संत म्हणजे ईश्‍वराचे सगुण रूप ।
संत म्हणजे सर्वज्ञानी ।
संत म्हणजे संयम असणारे ।
संत म्हणजे सतत ईश्‍वरी अनुसंधात असणारे ॥ १ ॥

संत म्हणजे सकारात्मक ऊर्जा ।
संत म्हणजे साधकांना समजून घेणारे ।
संत म्हणजे साधकांच्या प्रगतीसाठी तळमळणारे ।
संत म्हणजे साधनेविषयी योग्य मार्गदर्शन करणारे ॥ २ ॥

संत म्हणजे साधना कृतीतून शिकवणारे ।
संत म्हणजे सदाचरणासह सत्सेवा करणारे ।
संत म्हणजे ईश्‍वरी चैतन्य असलेले तेजस्वी ।
संत म्हणजे त्यागी वृत्ती असलेले तपस्वी ॥ ३ ॥

– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक