Muslims Attack Tribal Festivals In Ranchi : रांची (झारखंड) येथे आदिवासींच्या उत्सवांवर मुसलमानांचे आक्रमण

अनेक जण घायाळ

रांची (झारखंड) – येथे आदिवासी समाजातील सरना पंथाचा ‘सरहुल’ हा सण  साजरा करण्यात येत असतांना धर्मांध मुसलमानांनी त्यावर आक्रमण केल्याच्या घटना १ एप्रिल या दिवशी घडली. हेथबालू येथे या सणाच्या वेळी मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी तिच्यावर आक्रमण करण्यात आले. यात काही जण घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सणांच्या वेळी निसर्गाची पूजा केली जाते. या वेळी पुरुष आणि स्त्रिया आगीभोवती फिरत नाचतात.

१. मुसलमानांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला विद्युत् दिवे लावले होते. सरहुलच्या निमित्ताने आदिवासी समुदायाने तेथे सरना ध्वज फडकवला. एक दिवस आधीही यावरून दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता. १ एप्रिलला आदिवासी समुदायाचे लोक सरहुल साजरा करण्यासाठी येथे पोचले, तेव्हा हाणामारी झाली. यात मिरवणुकीतील ८ जण घायाळ झाले आहेत, तर मुसलमानांचे म्हणणे आहे की, त्यांचे ४ जण घायाळ झाले.

२. गावकर्‍यांचे म्हणणे आहे की, आरिफ अन्सारी याने भांडणाच्या वेळी शस्त्रे दाखवली. त्याला पकडण्यात आले असून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे; परंतु पोलिसांनी अद्याप या आरोपांना दुजोरा दिलेला नाही.

३. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन येथील सारना स्थळांचे संरक्षण करू शकत नाहीत किंवा सरहुल उत्सवाचे रक्षणही करू शकत नाहीत.

संपादकीय भूमिका

राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्वतः आदिवासी समाजातील आहेत. त्यामुळे ते आता आदिवासींना न्याय देतात कि मुसलमानांचे लांगूलचालन करतात ?, हे पहायला हवे !