राजस्थान येथील श्री. दीपक लढ्ढा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम

१. ‘आपण उपयोग करत असलेल्या वस्तूही साधकच आहेत’, असा भाव ठेवायला हवा ! : ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर एका साधिकेने मला वस्तू व्यवस्थित न ठेवण्याविषयीची एक चूक सांगितली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपण एकटेच साधना करत नाही, तर आपण उपयोगात आणत असलेल्या सर्व वस्तूसुद्धा साधना करतात. प्रत्येक ‘वस्तू’ म्हणजे साधकच आहे.’

२. चिंतन सारणी भरतांना मनात कसा भाव ठेवावा ? : ‘चिंतन सारणी भरतांना मनात कोणता भाव ठेवू ?’, याविषयी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात विचार आला, ‘आपण दिवसभर मिळवलेले धन घरी आणून तिजोरीत ठेवतो. त्यामुळे त्या धनात वाढ होते. त्याचप्रमाणे आपण दिवसभरात केलेली साधना केवळ चिंतन सारणीत नाही, तर आपल्या साधनेच्या तिजोरीत ठेवत आहोत. आपण ती ईश्‍वराला दाखवण्यासाठी ठेवत आहोत, म्हणजे त्यात प्रतिदिन वाढ होईल !’

– श्री. दीपक लढ्ढा, राजस्थान