माघ कृष्ण पक्ष पंचमी (३.३.२०२१) या दिवशी चि. रुक्मिणी अविनाश जाधव हिचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
गर्भारपणात प्रारंभी चि. रुक्मिणीची आई सौ. स्वानंदी देहली येथील सेवाकेंद्रात सेवारत होत्या. त्या कालावधीत त्यांनी अनुभवलेली संतांची प्रीती आणि अन्य अनुभूती आपण ३ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/455871.html
१. गर्भारपण
१ ई. ८ ते ९ मास
१ ई १. सासरच्या घरी गेल्यावर जाणवलेली सूत्रे
१ ई १ अ. घरात आध्यात्मिक त्रास असल्यामुळे पूर्वी घरी गेल्यावर ‘पुष्कळ ग्लानी येणे, झोपावेसे वाटणे’, असे त्रास होणे; मात्र या वेळी ‘स्वतःमधील उत्साह आणि चैतन्य वाढले आहे’, असे जाणवणे : ‘सासरी आमच्या घरी पूर्वीपासूनच आध्यात्मिक त्रास असल्याने मी घरी असतांना मला ‘अनावर ग्लानी येणे, काही करावेसे न वाटणे, झोपून रहावेसे वाटणे’, असे आध्यात्मिक त्रास व्हायचे. सातव्या मासात मी घरी आल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मला होणार्या या त्रासांमध्ये पुष्कळ पालट झाला आहे. पूर्वी घरी असतांना मला नामजपादी उपाय करण्याची लवकर आठवण होत नसे आणि ते करण्याची इच्छाही होत नसे; मात्र या वेळी ‘स्वतःमधील उत्साह आणि चैतन्य वाढले आहे’, असे मला जाणवले.
१ ई १ आ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना गर्भाची हालचाल जाणवणे आणि सनातनच्या तीनही गुरूंना गर्भाचा नमस्कार सांगितल्यावर हालचाली थांबत असणे : घरी असतांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयीचा लेख वाचतांना ‘गर्भ पोटात हळुवार हालचाली करून परात्पर गुरुमाऊलीला, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नमस्कार सांगत आहे’, असे मला जाणवायचे. तसे मी सांगितल्यानंतर गर्भाची हालचाल थांबत असे.
१ ई १ इ. मनात अयोग्य विचार चालू झाल्यास गर्भाची जोरात हालचाल होणे, तर नामजप, प्रार्थना, कृतज्ञता इत्यादी करतांना गर्भाची हालचाल सौम्य आणि आल्हाददायक असणे : माझ्या मनात साधकांविषयी अथवा इतर कुठले अयोग्य आणि अनावश्यक विचार चालू असतील, तेव्हा गर्भ पोटात जोराने हालचाल करून मला त्याची जाणीव करून द्यायचा. याउलट प्रार्थना आणि कृतज्ञता आदींच्या वेळी बाळाची हालचाल सौम्य आणि आल्हाददायक असायची.
१ ई २. प्रसुतीसाठी घरी (माहेरी) गेल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. ‘अधिकाधिक वेळ नामजप करावा. नामाच्या डोंगरामध्ये बसून रहावे’, असे वाटायचे.
आ. मधे मधे परात्पर गुरुमाऊलींची तीव्रतेने आठवण येऊन देवभेटीसाठी रडू यायचे.
इ. ‘मला आणि बाळाला तन, मन, बुद्धी आणि चित्त यांसह गुरुचरणांशी समर्पित होता येऊ दे’, अशी प्रार्थना होत असे.
ई. १.१.२०२० ते १.३.२०२० या कालावधीत ‘महाशून्य’ हा नामजप करण्यास सांगितला होता. हा नामजप करतांना मला ‘बाळ स्वतःच्या गर्भात नसून निर्गुण पोकळीत आहे’, असे जाणवायचे आणि पोटाला हलकेपणा जाणवायचा. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनीही ‘गर्भपोकळी जाणवत आहे’, असे सांगितले.
१ ई ३. अनुभूती
१ ई ३ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच तुला अन्न-पाणी आणि हवा पुरवून तुझे पालनपोषण करत आहेत, त्यामुळे तेच तुझे खरे माता-पिता आहेत’, असे गर्भाला सांगणे : दुपारी गर्भाची हालचाल होऊ लागल्यावर मी त्याच्याशी सहज बोलू लागले, ‘आईच्या गर्भाशयात असतांनाही परात्पर गुरुमाऊली प्रत्येक जिवाची पुष्कळ काळजी घेतात. आईच्या गर्भाशयातील पाणी हे ‘गुरुदेवांच्या चरणांचे चैतन्यमय तीर्थच आहे’, असा भाव ठेवण्याचा तू प्रयत्न कर ! आईशी जोडल्या गेलेल्या नाळेतून तुला तेच आवश्यक ते अन्न-पाणी आणि वायू पुरवतात. तेच तुझा प्रत्येक अवयव निर्माण करून त्या अवयवाची वाढ आणि पालन-पोषण करतात. तुला काहीच कळत नसतांनाही तुझ्या शरिराच्या सर्व क्रिया तेच करवून घेतात. त्यामुळे गुरुदेवच तुझे माता-पिता, बहीण, बंधू आणि सखा, असे सर्वस्व आहेत.
१ ई ३ अ १. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली साधना श्रद्धेने करण्याचा प्रयत्न कर’, असे गर्भाला सांगितल्यावर हातावर सोनेरी दैवी कण दिसणे : सनातनच्या प्रत्येक साधकाची नाळ अनेक जन्मांपासून परात्पर गुरुमाऊलींशी जोडलेली असून अनेक जिवांचा उद्धार होईपर्यंत ती तशीच जोडलेली असणार आहे. त्यांची भक्ती, सेवा आणि प्राप्ती यांसाठी हे जीवन समर्पित करायचे आहे. त्यामुळे तूही निश्चिंतपणे त्यांनी सांगितलेली साधना श्रद्धेने करण्याचा प्रयत्न कर.’ हे सर्व बोलत असतांना माझी भावजागृती होत होती आणि ‘स्वतःही गुरुदेवांनी सांगितलेली साधना मनापासून आणि झोकून देऊन करण्याचा प्रयत्न करायचा’, असा विचार मनात आला. त्यानंतर ५ – ६ मिनिटांनी माझे लक्ष माझ्या हाताकडे गेले. तेव्हा हातावर सोनेरी दैवी कण दिसत होते. या दैवी कणाच्या माध्यमातून ‘देव समवेत आहे’, याची प्रचीती मला आली आणि अधिकच कृतज्ञता वाटली.
१ ई ३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘विष्णुतत्त्व जागृती सोहळ्या’च्या वेळी ‘त्यांच्यातील श्रीविष्णुतत्त्व कार्यरत होण्यासाठी त्यांची स्तुती करतांना तिचा प्रारंभ श्रीविष्णुसहस्रनामाने करावा’, असे श्री. विनायक शानभाग यांनी सांगणे आणि त्या वेळी गर्भधारणा झाल्यानंतर श्रीविष्णुसहस्रनाम ऐकण्याची इच्छा होत असल्याचे लक्षात येणे : ११.१२.२०१९ या दत्तजयंतीच्या दिवशी रामनाथी आश्रमात महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘विष्णुतत्त्व जागृती सोहळा’ झाला. या सोहळ्याचे महत्त्व विशद करतांना श्री. विनायक शानभाग यांनी सांगितले, ‘‘आज विष्णुस्वरूप गुरुमाऊलींची वादन, गायन आणि नृत्य यांच्या माध्यमातून स्तुती केल्यास त्यांच्यातील श्रीविष्णुतत्त्व कार्यरत होऊन साधकांना त्याचा अधिकाधिक लाभ होणार आहे. गुरुमाऊलींच्या विष्णुस्वरूपाची स्तुती करतांना तिचा प्रारंभ श्रीविष्णुसहस्रनामाने करावा.’’
त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘गर्भारपणात तिसर्या मासापासून माझ्या मनात बाळावर संस्कार होण्यासाठी ‘श्रीविष्णुसहस्रनाम ऐकावे’, असा विचार येत होता. त्याप्रमाणे माहितीजालावरून (इंटरनेटवरून) श्रीविष्णुसहस्रनाम ‘डाऊनलोड’ करून घेऊन मी ते नियमित ऐकू लागले. या वेळी प्रतिदिन पहाटे ३.३० नंतर मला आपोआप जाग यायची आणि त्या वेळी ‘श्रीविष्णुसहस्रनाम ऐकावे अन् ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील परात्पर गुरुदेवांचे विष्णुस्वरूपातील दर्शन घ्यावे’, असे तीव्रतेने वाटायचे. मी डोळे बंद केल्यावर मला त्यांचे शेषशायी सिंहासनावरील विष्णुरूपातील स्मरण व्हायचे.’
(क्रमशः)
– सौ. स्वानंदी अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/456432.html
|