भारत आणि चीन सैन्य पँगाँगमधून मागे फिरले; पण देपसांगचे काय ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा केंद्र सरकारला प्रश्‍न

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – चीन आणि भारत यांनी पँगाँग सरोवर परिसरातून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचे काही माध्यमांनी घोषित करून टाकले आहे; म्हणजेच जूनमध्ये भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रणरेषा पार केली ती जागा आपण सोडली आहे; पण देपसांगच काय, जिथे चीनच्या सैन्याने छावण्या उभारल्या आहेत ?, असा प्रश्‍न भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी केंद्रातील भाजप सरकारला विचारला आहे.