१. आश्रमात आल्यावर चैतन्य मिळून हलके वाटणे
‘रामनाथी आश्रमात आल्यावर पुष्कळ जांभया येऊन माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. नंतर मला पुष्कळ हलके वाटून त्रास निघून गेल्यासारखे वाटले.
२. ध्यानमंदिरात नामजप करत असतांना मला पुष्कळ गारवा वाटत होता. त्या वेळी माझा नामजप एका लयीत होत होता.
३. पू. होनपकाकांच्या समवेत नामजप करतांना सुगंधाची अनुभूती येणे
परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत मला पू. होनपकाकांच्या समवेत नामजप करण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘स्थूल देह, सूक्ष्म देह, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी आणि अहं यांची शुद्धी होऊन अन् मन निर्मळ होऊन ते देवाच्या चरणी अर्पण होऊ दे’, अशी अंतर्मनातून प्रार्थना झाली. त्या वेळी देवाने मला दैवी सुगंधाची अनुभूती दिली. त्याविषयी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. प्रगती प्रमोद राऊत, चिपळूण, रत्नागिरी. (२९.२.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |