‘येणार्‍या आपत्काळात गुरुभक्ती आणि गुरूंवरील श्रद्धा तारणार आहे’, याची साधकाला आलेली अनुभूती !

१. संतांच्या मर्दनाच्या सेवेसाठी गेल्यावर मनातील विचार वाढणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे आणि घशाला कोरड पडणे

‘एकदा सकाळी मी एका संतांच्या सेवेसाठी गेलो होतो. त्या वेळी मला त्यांच्या खोलीत एकदम अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटण्याचे कारण मला कळत नव्हते. कोणतेही कारण नसतांना माझ्या मनातील विचार वाढले होते. त्यांची सेवा करतांना गुदमरल्यासारखे होऊन मला श्‍वास घेतांना पुष्कळ त्रास होऊ लागला. घशाला एकदम कोरड पडून माझा घसा अधिकच खवखवायला लागला. ‘पाणी प्यावे किंवा मिंटची एखादी गोळी खावी’, असे मला वाटत होते; परंतु मला ते मागणे शक्य होत नव्हते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धावा केल्यावर ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप चालू होणे, श्‍वासावाटे त्रास निघून जाऊन बरे वाटणे आणि या अनुभूतीतून परात्पर गुरु डॉक्टरांच्या नामाचे सामर्थ्य लक्षात येणे

मी मनातून परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा केला. काही वेळाने मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवली. माझा ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’ हा नामजप आतून आपोआप चालू झाला. श्‍वासनलिकेच्या ज्या भागाला मला त्रास होत होता, त्यातून तो नामजप पुढे पुढे सरकत विशुद्धचक्राकडे आला आणि मला होत असलेला त्रास श्‍वासावाटे निघून गेल्याने मला बरे वाटायला लागले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या नामात किती सामर्थ्य आहे !’,

हे साक्षात् श्रीमन्नारायणरूपी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सेवेच्या माध्यमातून अनुभवायला दिले. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘येणार्‍या घोर आपत्काळात गुरुभक्ती आणि गुरूंवरील श्रद्धा तारणार आहे’, असे ईश्‍वराने या अनुभूतीतून मला शिकवले.’

– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक