देशातील २२४ निवृत्त सनदी अधिकार्‍यांचे उत्तरप्रदेशातील ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला समर्थन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील भाजप सरकारने बनवलेल्या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या विरोधात देशातील १०४ निवृत्त सनदी अधिकार्‍यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून कायदा मागे घेण्याची मागणी केली होती. आता या कायद्याचे देशातील २२४ निवृत्त सनदी अधिकार्‍यांनी समर्थन केले आहे.

२२४ निवृत्त सनदी अधिकार्‍यांनी दिलेले पत्र वाचण्यासाठी खालील चित्रांवर क्लिक करा –

– १ –
– २ –
– ३ –

त्यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे. ‘फोरम ऑफ कन्सर्ड सिटिझन्स’ या समूहांतर्गत कार्य करणार्‍या या अधिकार्‍यांनी या पत्रात म्हटले आहे की, स्वतःला अराजकीय म्हणवणार्‍या सेवानिवृत्त सनदी अधिकार्‍यांचा एक समूह पक्षपाती असून त्यांचे धोरण विरोधी पक्षासारखे आहे.