आरोशी येथे १२ घंटे रेल्वेमार्ग अडवून विकास प्रकल्पांचा केला निषेध

मडगाव, १९ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण आणि मोले वीजवहन प्रकल्प या महत्त्वाच्या प्रकल्पांना विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांनी १८ डिसेंबरच्या रात्री आरोशी येथे रेल्वेमार्गावर १२ घंटे बसून प्रकल्पांना विरोध दर्शवला. हे आंदोलन १८ डिसेंबरच्या रात्री १०.३० वाजता प्रारंभ झाले आणि शनिवारी सकाळी संपले. यामध्ये प्रामुख्याने ‘गोंयांत कोळसो नाका’ या संघटनेसमवेतच अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी कार्यकर्ते रेल्वे रूळावर बसले आणि त्यांनी त्या ठिकाणी मेणबत्त्या पेटवल्या. प्रकल्पांच्या विरोधात या वेळी घोषणा देण्यात आल्या.