वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतही शेतकर्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात आली. यामध्ये शीख समुदायाचा मोठा सहभाग होता. सॅन फ्रान्सिको येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर मोर्चा काढण्यात आला. कॅलिफोर्नियातील विविध भागात आंदोलन झाले.
Hundreds of Sikh-Americans have held peaceful protest rallies in several cities across the US in support of the Indian farmers who have been protesting against the new agricultural reforms in India.https://t.co/BjLD6UQxuK
— Economic Times (@EconomicTimes) December 6, 2020
इंडियानापोलिसमध्येही आंदोलन करण्यात आले. शिकागोमध्ये शीख-अमेरिकी समुदायाच्या लोकांनी एकत्र येऊन भारतीय दूतावासापर्यंत मोर्चा काढला. ‘भारतातील कृषी कायद्यामुळे शेती आता खासगी क्षेत्रासाठी उघडण्यात येणार आहे. मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांना याचा लाभ होणार आहे. या कायद्यामुळे शेतकर्यांची मोठी हानी होणार आहे’, असा दावा आंदोलकांनी केला आहे.