नायजेरियामध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून ११० शेतमजुरांचा शिरच्छेद

अशा घटनांचा इस्लामी देश, इस्लामी संघटना, मौलवी आदी कधीही उघडपणे विरोध करतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !

रविवारी 43 शेतकर्‍यांना पुरण्यात आले

मेदुगुरी (नायजेरिया) – येथे बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनेने ११० शेतमजुरांना दोरीने बांधून त्यांची गळे चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. हे शेतमजूर एका शेतात काम करत होते. बोको हराम या भागात सक्रीय असून तिचे आतंकवादी सातत्याने कामगारांवर आक्रमण करत असतात. नायजेरियाचे राष्ट्रपती महंमद बुहारी यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. मागील मासामध्ये बोको हरामच्या आतंकवाद्यांनी २ वेगवेगळ्या घटनेत मेदुगुरीजवळ २२ शेतकर्‍यांना ठार केले होते.

नायजेरियामध्ये वर्ष २००९ नंतर आतापर्यंत जवळपास ३६ सहस्र जणांना आतंकवादी आक्रमणामुळे प्राण गमवावे लागले असून जवळपास २ लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. नायजेरियाला ‘इस्लाम’मय करण्यासाठी ख्रिस्ती नागरिकांना ठार करणे आणि पाश्‍चिमात्य देशांना सहकार्य करणार्‍या सरकारला विरोध करण्यासाठी सरकारी संपत्तीवर अन् अधिकार्‍ंयावर आक्रमण करून दहशत पसरवणे हे बोको हरामचे मुख्य काम आहे.