हिंदुद्वेष्ट्या कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांच्यावर ‘गोमाता’ शब्दाचा वापर करण्यास बंदी !

  • केरळ उच्च न्यायालयाचा आदेश

  •  फातिमा ‘सामाजिक माध्यमां’वरून हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावत असल्याचे नमूद करत न्यायालयाचे ताशेरे !

हिंदूंच्या भावना जाणीवपूर्वक दुखावणार्‍या फातिमा यांच्यावर केवळ एक शब्द वापरण्यावर बंदी घालण्यापेक्षा त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना आजन्म सामाजिक माध्यमांचा (सोशल मिडियाचा) वापर न करण्याची शिक्षा द्यायला हवी, असेच हिंदूंना वाटते !

हिंदूंच्या भावना जाणीवपूर्वक दुखावणार्‍या फातिमा

थिरूवनंतपूरम् – केरळ उच्च न्यायालयाने हिंदुद्वेषी कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांना ‘गोमाता’ या शब्दाचा कोणत्याही माध्यमातून वापर न करण्याचा आदेश दिला आहे. गोमातेविषयी फातिमा यांना यापुढे कोणतेही मत अथवा टिपणी व्यक्त करता येणार नाही. फातिमा यांनी काही कालावधीपूर्वी गोमांसापासून बनवण्यात आलेल्या खाद्यपदार्थाला ‘गोमाता’ असा उल्लेख केला होता.

न्यायमूर्ती सुनील थॉमस यांना रेहाना फातिमा यांनी वर्ष २०१८ मध्येही ‘गोमाता’ या शब्दाचा अवमान करणार्‍या पोस्ट सामाजिक माध्यमांवरून (सोशल मिडियावरून) वारंवार केल्याचे लक्षात आले. या माध्यमातून त्या जाणीवपूर्वक लाखो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत, हे न्यायमूर्ती थॉमस यांनी सांगत फातिमा यांच्यावर या शब्दाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.


या आधीही फातिमा यांनी अनेकवेळा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याचे न्यायालयासमोर आले होते. आता त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज ही ‘फातिमा यांना शेवटची संधी देत आहोत’, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.