
बेंगळुरू – गोकर्ण येथील श्री रामचंद्रपुरा मठाचे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री राघवेश्वर भारती स्वामी यांच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेले बलात्काराचे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाने रहित केले. घटना नोंदवण्यात ९ वर्षांचा लक्षणीय विलंब झाल्याचे नमूद करून न्यायमूर्ती एम्. नागप्रसन्न यांनी हा आदेश दिला.
१. २९ ऑगस्ट २०१५ या दिवशी पीडितेने बेंगळुरूमधील गिरिनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. श्री रामचंद्रपुरा मठाचे श्री राघवेश्वर भारती स्वामी यांनी बेंगळुरूमधील गिरिनगर येथे आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.
२. गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने या प्रकरणाचे अन्वेषण करून ७ सप्टेंबर २०१८ या दिवशी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते.
३. श्री राघवेश्वर स्वामींनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून न्यायालयात दाखल केलेले आरोपपत्र आणि कार्यवाही रहित करण्याची मागणी केली होती.