श्री अन्नपूर्णा देवतेला प्रार्थना !

अन्नपूर्णे सदापूर्णे
शंकर प्राण वल्लभे ।

ज्ञान वैराग्य सिद्धर्थ
भिक्षां देहि च पार्वति ॥

भावार्थ : आई अन्नपूर्णे, तू सदा पूर्ण आहेस. शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस. मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ.


श्री अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्य पुरवणारी देवता. ती पार्वतीचा अवतार आहे. काशी नगरीमध्ये श्री अन्नपूर्णेचे मंदिर असून ‘त्या क्षेत्रातील समस्त जनता जेवल्याविना ती अन्नग्रहण करत नाही’, असे समजले जाते. चांद्रसेनीय कायस्थ समाजात गृहिणी आपला पती प्रवासाहून घरी येण्याच्या वेळी देवीची पूजा करतात. तिच्या मस्तकावर पिवळ्या अक्षता वहातात आणि ‘घरी येणार्‍या थोर पाहुण्याचे (पतीचे) रक्षण कर’, अशी प्रार्थना करतात.