‘भारत आणि भारतनिष्ठा हा सार्याच पक्षांनी परम पवित्र असा मानबिंदू मानावयास हवा होता. भारतमातेच्या रक्ताने रंगलेले हात कुठल्याही प्रलोभनासाठी कुणीही हातात घ्यावयास नको होते; पण प्रत्यक्षात मात्र काही विपरीत घडले. देशहितापेक्षा पुन्हा एकदा पक्षहित महत्त्वाचे मानले गेले. सत्तापिपासेला पुन्हा एकदा सत्त्वाचा बळी दिला गेला. मुसलमानांच्या मनधरणीचा तोच जुना खेळ नव्या भयानकतेने रंगू लागला. अनेक पक्षोपपक्षात विभागली गेलेली बहुसंख्य संघटित अल्पसंख्यांकांची आराधना करू लागली. सत्तेचा तराजू ते तोलू लागले. जयापजयाचे पारडे ते फिरवू लागले.’
(साप्ताहिक राष्ट्रपर्व, ५.४.२०१० – संदर्भ : वाघनखे – पु.भा. भावे जन्मशताब्दी वर्ष २००९-२०१०)