
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मुरादाबाद येथे एका हिंदु महिलेला घरी बोलावून ओलीस ठेवणे, पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे धर्मांतर करणे आणि बलपूर्वक कलमा (अल्लाचा गौरव करणारी विधाने) वाचायला लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सुल्तान सलाउद्दीन आणि त्याची पत्नी मेहनाम बेगम यांना अटक करून कारागृहात पाठवले आहे. या प्रकरणात सहभागी असलेला मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आणि इतर २ आरोपी सध्या पसार असून त्यांचा शोध चालू आहे.
१. पीडित महिला तिच्या पतीपासून वेगळी रहात असून अनुमाने ३ वर्षांपूर्वी तिची ओळख मेहनाम बेगम हिच्याशी झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर आरोपींनी कट रचला. ६ फेब्रुवारी २०२६ या दिवशी मेहनाम बेगम हिने महिलेला विश्वासात घेऊन तिच्या घरी नेले. तेथे तिचा पती सुल्तान सलाउद्दीन, एक मौलवी आणि इतर २ जण आधीच उपस्थित होते.
२. तिथे महिलेला ओलीस ठेवून पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे धर्मांतर करण्यात आले आणि मौलवीने तिच्याकडून कलमा वाचून घेतला, असा आरोप आहे. यानंतर सलाउद्दीनने महिलेवर स्वतःशी निकाह करण्यासाठी दबाव आणला; मात्र तिने विरोध केल्यामुळे निकाह होऊ शकला नाही. ओलीसाच्या कालावधीत सलाउद्दीनने महिलेसोबत अश्लील चाळे आणि छेडछाड केल्याचाही आरोप आहे.
३. पीडिता कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली; मात्र अलीकडेच रस्त्यात भेटल्यावर आरोपींनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली.
९० सहस्र रुपयांची लाच स्वीकारणार्या पोलिसाला अटक
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
ठाणे येथे माजी खासदार विनायक राऊत आणि कुटुंबिय यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद
मुंबईतील ताज हॉटेलला बाँबची धमकी अफवाच : आरोपीचा शोध चालू
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !