९० सहस्र रुपयांची लाच स्वीकारणार्‍या पोलिसाला अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – गुटखा तस्करीचा खोटा गुन्हा नोंदवण्याची भीती दाखवून पेठ पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार मनोज दगू गायकवाड याने मांस विक्रेत्याला लाच मागितली. ९० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

गाडीत कोंबड्यांची वाहतूक होत असतांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. तक्रारदाराने आपल्या चिकन व्यवसायाची सर्व सत्यता आणि कागदपत्रे दाखवून पोलिसाला पटवून देण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयित अंमलदार गायकवाडने त्यांचे काहीही ऐकून न घेता गुन्हा नोंद न करण्यासाठी ६० सहस्र रुपये आधीच उकळले होते.  पुन्हा त्याला संपर्क करून १ लाख रुपये मागितले होते.

संपादकीय भूमिका

हा पोलीस म्हणजे वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पोलीस प्रशासनाचाच एक भाग आहे. पोलीस काय आणि लाचलुचपत प्रतिबंधक खाते काय, सर्वच जण भ्रष्टाचारी असल्याने जनतेचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही !