मुंबईतील ताज हॉटेलला बाँबची धमकी अफवाच : आरोपीचा शोध चालू

मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलला बाँबद्वारे उडवून देण्याची धमकी मध्यरात्री नियंत्रण कक्षाला मिळाली. ‘दाऊदने बाँब ठेवला आहे’, अशी त्यात माहिती होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने सर्वत्रची पहाणी केली; मात्र पडताळणीत संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नाहीत. तांत्रिक अन्वेषणात धमकीचा दूरभाष तुर्भे परिसरातून करण्यात आल्याचे समजले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.