
वाशी – नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (एन्.एम्.एम्.टी.) बससेवेच्या ताफ्यात ५१ बसगाड्यांचा समावेश करण्यात आला. या बसचे लोकार्पण मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सर्व परिवहन समिती सदस्य, तसेच परिवहन व्यवस्थापक उमाकांत जंगले, मुख्या लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, कार्यकारी अभियंता विवेक अचलकर, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात १५० सी.एन्.जी. बसगाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ६५ बस आल्या आहेत.
पर्यावरणपूरक, आधुनिक आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज अशा सी.एन्.जी. बसगाड्यांचा यात समावेश आहे.
सध्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ४१६ बसगाड्या कार्यरत आहेत. उर्वरित ८५ बसगाड्या नजीकच्या कालावधीत उपक्रमास प्राप्त होणार आहेत.
याप्रसंगी गणेश नाईक यांनी नव्या सीएनजी बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवास सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यामुळे इंधन खर्चात बचत होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे असे ते म्हणाले.
नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४०० महिलांना नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत बसचालक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. ज्या माध्यमातून एनएमएमटी बसेस चालवण्यासाठी आगामी काळात महिला बस चालक उपलब्ध होतील असे त्या म्हणाल्या. नवी मुंबईकरांना एनएमएमटी मार्फत चांगली व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड यांनी परिवहन उपक्रमाच्या प्रगतीसाठी व उपक्रम स्वयंपूर्ण होण्यासाठी घेतल्या जात असलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. तसेच परिवहनच्या वाहक, चालक व कर्मचार्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगितले.
ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी !
गोव्यात ‘होम स्टे’ला पंचायत किंवा नगरपालिका यांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची अट नको ! – नीती आयोग
वसई येथे आलेल्या महापुरात वाहनांची हानी !
अकोला येथील शेतकर्यांना हानीभरपाई
नाशिक शहर कार्यक्षेत्रात २७ जुलैपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश !
देशात ‘हरित शहर’ म्हणून नाशिकची ओळख निर्माण करू ! – मंत्री गिरीश महाजन