
पुणे, १२ जुलै (वार्ता.) – वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समन्वयाचे संस्कार देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार आहेत; म्हणूनच ते जगद्गुरु आहेत. ते जगभरात इंग्रजी भाषेच्या माध्यमातून पोचले पाहिजेत. तसा चांगला प्रयत्न श्री. दीपक फडणीस यांनी केला आहे, असे वक्तव्य संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक श्री. मुकुंद दातार यांनी केले.
डॉ. म.वि. गोखले पुरस्कृत ‘प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार’ दीपक फडणीस यांना ‘िडव्हाईन व्हर्सेस अभंगगाथा’ (संत तुकाराम महाराजांच्या ५२ लोकप्रिय अभंगांचे इंग्रजी रूपांतर) या ग्रंथासाठी मुकुंद दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या ‘माधवराव पटवर्धन सभागृहा’त हा ११ जुलै या दिवशी कार्यक्रम झाला. सन्मानपत्र आणि ७ सहस्र रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्री. मुकुंद दातार म्हणाले, ‘‘मराठी जनांसाठी तुका म्हणे, हा जणू सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यांनी नामसंकीर्तनाला लोकसंग्रहाची जोड दिली. फडणीस यांनी आधुनिक काळात तुकोबांचे हे लोकविलक्षण कवित्व इंग्रजी भाषेतून जगभर पोचवण्याचे कार्य केले आहे.’’
श्री. दीपक फडणीस म्हणाले, ‘‘हा पुरस्कार म्हणजे नम्र करणारा भावपूर्ण क्षण असून माझ्यासाठी आनंदाचा उत्सव आहे. तुकोबांवर लघुपट करत असून नव्या वाटांनी तुकोबांचा शोध घेतला जावो, वेगळ्या वाटा सापडोत आणि नवे अभ्यासक, संशोधक जगद्गुरूंच्या कालातीत संदेशाचे वाहक होवोत, एवढीच प्रार्थना आहे.’’
मोशी (पुणे) येथील दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू !
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सिद्ध !
ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी !
गोव्यात ‘होम स्टे’ला पंचायत किंवा नगरपालिका यांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची अट नको ! – नीती आयोग
एन्.एम्.एम्.टी.च्या ताफ्यात ५१ गाड्यांचे लोकार्पण !
वसई येथे आलेल्या महापुरात वाहनांची हानी !