
मुंबई – नोव्हेंबर २०२३ ते जून २०२६ या कालावधीत मराठी नामफलक न लावणार्या ६ सहस्र ३२० आस्थापनांवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या सर्व आस्थापनांवर न्यायालयीन आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आमदार संतोष दानवे यांनी विधानसभेत १० जुलै या दिवशी राज्यातील सर्व आस्थापनांनी मराठी भाषेत नामफलक लावण्याविषयीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीची लेखी माहिती दिली आहे.
१. मुंबईतील ३ सहस्र ८६१ आस्थापनांकडून १ कोटी ९५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. १ सहस्र ३ आस्थापनांकडून ‘अपराध प्रशमन शुल्क’ (ठराविक दंड आकारून प्रकरण सामोपचाराने मिटवणे) घेण्यात आले आहे. उर्वरित १ सहस्र ४५६ आस्थापनांच्या विरोधात न्यायालयात खटले प्रविष्ट करण्यात आले आहेत.
२. नोव्हेंबर २०२३ ते जून २०२६ या कालावधीत प्रशासनाकडून मुंबईतील २ लाख ६७ आस्थापनांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये १ लाख ९३ सहस्र ७४७ आस्थापनांनी मराठी नामफलक लावले होते.
३. ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमा’नुसार राज्यातील आस्थापनांनी मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक आहे. सर्वाेच्च न्यायालयानेही महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापने यांनी मराठीत नामफलक लावण्याचा अंतरिक आदेश २५ सप्टेंबर २०२३ या दिवशी दिला आहे.
हिंदु महिलेला ओलीस ठेवून, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे धर्मांतर करणार्या मुसलमान दांपतत्याला अटक
ठाणे येथे माजी खासदार विनायक राऊत आणि कुटुंबिय यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद
मुंबईतील ताज हॉटेलला बाँबची धमकी अफवाच : आरोपीचा शोध चालू
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !
१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी