ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी ! 

शाळा प्रशासनाने दायित्व झटकले !

ठाणे – येथील वर्तकनगर भागातील एका खासगी शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या १६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी मुंबईतील लोअर परळ येथे नेण्यात आले होते. भोजनानंतर ५५ ते ६० विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब झाले. त्यांना उपचारांसाठी विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले. ‘या प्रकरणाची सखोल चौकशी करून उत्तरदायी शाळा प्रशासन आणि संबंधित यांच्यावर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. शाळा प्रशासनाने उत्तरदायित्व टाळत विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती अल्प असल्याचे कारण दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पालक संतप्त आहेत.