वसई येथे आलेल्या महापुरात वाहनांची हानी !

एआय निर्मित चित्र

वसई – १ जुलैला मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात २ चारचाकी आणि ३ दुचाकी वाहून गेल्या होत्या. आता पाणी ओसरल्यानंतर शोधमोहीम चालू करण्यात आली. वाघराळपाडा परिसरातील नाल्याला भीषण पूर आला होता. १२ दिवसांनंतर   नाल्यातील पाण्याची पातळी ओसरल्याने शोधमोहीम चालू करण्यात आली. या मोहिमेत ‘मारुती इको’ अक्षरशः चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत मिळाली. नाल्यातील मोठमोठ्या दगडांना आणि इतर वस्तूंना धडकल्यामुळे या चारचाकी अक्षरशः झाला आहे. गाडीचा केवळ एक लोखंडाचा सांगाडा झाल्याने गाडी ओळखणेही कठीण झाले.