भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप

ठाणे, १२ जुलै (वार्ता.) – मुंब्रा परिसरात ४० सहस्र बांगलादेशींची नावे बोगस पद्धतीने मतदार सूचीत समाविष्ट करण्याचे काम चालू आहे, असा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. (प्रशासनाने या प्रकरणी त्वरित शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करायला हवी ! – संपादक) विशेष गहन पुनरावलोकन (एस्.आय.आर्.) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
सोमय्या म्हणाले की, विदर्भ-मराठवाड्यात या प्रक्रियेला चांगली गती मिळाली असली, तरी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि कोकण विभागात अपेक्षित वेगाने काम होत नाही. नागरिकांनी स्वतःची नावे मतदार सूचीतून पडताळून आवश्यक ती नोंदणी करावी. मशिदींमधून कथित बोगस मतदार नोंदणीसाठी अर्ज भरले जात आहेत. अशा नावांवर हरकती नोंदवून ती मतदार सूचीतून वगळण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
हिंदु महिलेला ओलीस ठेवून, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे धर्मांतर करणार्या मुसलमान दांपतत्याला अटक
मुंबईतील ताज हॉटेलला बाँबची धमकी अफवाच : आरोपीचा शोध चालू
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !
मराठी नामफलक न लावणार्या मुंबईतील ६ सहस्रांहून अधिक आस्थापनांवर कारवाई !
१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी
Byrathi Suresh : सुट्टे पैसे न दिल्याने मंत्र्यांना वाहकाने बसमधून खाली उतरवले !