एका कर्मचार्याचे शोधकार्य चालू

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोत ८ जुलै या दिवशी कचर्याचा डोंगर कोसळून इमारत ढासळल्याच्या दुर्घटनेत दबलेल्या ७ जणांचे मृतदेह ४ थ्या दिवशी म्हणजे ११ जुलै या दिवशी काढण्यात आले. इमारतीच्या बाजूला दुसरीकडे कचर्याच्या ढिगाखाली दबलेल्या एका व्यक्तीचा शोध चालू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगार्याखाली दबलेल्या ९ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. १० जुलैला भावेश वाणी यांचा मृतदेह सापडला. ढिगार्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला’च्या मार्गदर्शनाखाली बचावाचे कार्य चालू होते.
राजकारण्यांचे या घटनेकडे दुर्लक्ष झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुणे येथे आले, तर आम्हाला भेटायला का आले नाहीत ? असा प्रश्न नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.
मृतांच्या नातेवाइकांना ४० लाख रुपयांचे साहाय्य !
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना महापालिका १० लाख रुपये, राज्य सरकार ५ लाख रुपये आणि संबंधित आस्थापन २५ लाख रुपये यांचे आर्थिक साहाय्य करणार आहे. पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाचे दायित्व संबंधित आस्थापन घेणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.
जगद्गुरु तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार ! – मुकुंद दातार, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सिद्ध !
ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी !
गोव्यात ‘होम स्टे’ला पंचायत किंवा नगरपालिका यांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची अट नको ! – नीती आयोग
एन्.एम्.एम्.टी.च्या ताफ्यात ५१ गाड्यांचे लोकार्पण !
वसई येथे आलेल्या महापुरात वाहनांची हानी !