
पुणे – ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’त उपचारासाठी आलेल्या रुग्ण आणि नातेवाइक यांसह वारकर्यांना ख्रिस्ती धर्माची पत्रके वाटली. हिंदु धर्मापेक्षा ख्रिस्ती धर्म चांगला आहे, असा प्रचार करत त्यांना ‘कृपासनम’ नावाची पत्रके वाटत ‘येशूची प्रार्थना केल्यास लवकर बरे व्हाल’, असे सांगत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणार्या सुनील वर्गीस आणि प्रतिमा सुनील वर्गीस या पती-पत्नींवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी ऋषीकेश पांडे यांनी तक्रार प्रविष्ट केली.
१. १० जुलै या दिवशी पांडे मित्रांसह ‘ससून रुग्णालया’त गेले होते. तेव्हा ‘ओपीडी’ (बाह्य रुग्ण पडताळणी) समोर हे पती-पत्नी ‘कृपासनम’ नावाचे पत्रक वाटत होते.
२. ‘उपचारांपेक्षा येशूची प्रार्थना केल्यास लवकर बरे व्हाल’, असे ते सांगत होते. त्या पत्रकामध्ये येशूच्या प्रार्थनेमुळे अनेक आजार बरे झाले, नोकरी मिळाली, अपत्यप्राप्ती झाल्याचे अनुभव नमूद करण्यात आले होते.
३. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीतील उपचारासाठी आलेल्या वारकर्यांनाही ‘ख्रिस्ती धर्म इतर धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे’, असे सांगितले जात होते.
४. या दांपत्याकडून जाणीवपूर्वक हिंदु धर्माचा अपमान करणे, अपशब्द बोलणे आणि भूलथापा देऊन ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणे, अशी कृत्ये केली जात होती, असा आरोप पांडे यांनी केला आहे.
एन्.एम्.एम्.टी.च्या ताफ्यात ५१ गाड्यांचे लोकार्पण !
वसई येथे आलेल्या महापुरात वाहनांची हानी !
अकोला येथील शेतकर्यांना हानीभरपाई
नाशिक शहर कार्यक्षेत्रात २७ जुलैपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश !
देशात ‘हरित शहर’ म्हणून नाशिकची ओळख निर्माण करू ! – मंत्री गिरीश महाजन
मुंबईतील ताज हॉटेलला बाँबची धमकी अफवाच : आरोपीचा शोध चालू