१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी

हायड्रोजन फ्यूल-सेल ट्रेन

नवी देहली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पहिल्या ‘हायड्रोजन फ्यूल-सेल ट्रेन’ला येत्या १७ जुलैला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करणार आहेत. ही अत्याधुनिक आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक रेल्वे हरियाणातील जींद-सोनीपत या मार्गावर चालवण्यात येणार आहे.

ही हायड्रोजन इंधनावर चालणारी भारतातील पहिली रेल्वे आहे. या गाडीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही धावतांना पर्यावरणाला हानी पोचवणारा विषारी धूर सोडत नाही, तर तिच्या सायलेन्सरमधून केवळ शुद्ध पाण्याचे थेंब आणि वाफ बाहेर पडते. हे तंत्रज्ञान आत्मसात करणार्‍या जगातील मोजक्या देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे.