प्राचीन भारतीय ज्ञान ‘आरोग्य विज्ञान’ म्हणून परत आले आहे !
हे आरोग्यविज्ञान माझ्यासाठी प्रयोगशाळेत चालू झाले नाही. याचा प्रारंभ माझ्या स्वतःच्या आजीच्या शांत शिस्तीत झाला. प्रतिदिन ती पहाटे ४ वाजता आधी उठायची. तिने आदल्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर काहीही खाल्ले नसायचे. सहसा अनुमाने सायंकाळी ६ वाजता ती खायची आणि प्रतिदिन तिचा सुमारे १७ घंटे उपवास व्हायचा. सूर्योदयापूर्वीच्या शांततेत ती ध्यानधारणेसाठी बसून नंतर चालत मंदिरात जात असे. तिच्या स्नानानंतरच सुमारे ११ वाजता ती हळूवारपणे तिचा उपवास सोडत असे. कोणतेही ‘फिटनेस ॲप्स’ (शरीर तंदुरुस्तीसाठीची प्रणाली) नव्हते, ‘ग्लुकोज मॉनिटर’ (शरिरातील मधुमेह मोजण्यासाठीचे यंत्र) नाहीत, दीर्घायुष्यासाठी ‘पॉडकास्ट’ (छोट्या मुलाखती) नाहीत. ‘बायोहॅकिंग’ शब्दसंग्रह नाही. सिलिकॉन व्हॅलीचे कोणतेही गुरु ‘सर्केडियन ताल’ (नैसर्गिक घड्याळाचा ताल) किंवा ‘चयापचय लवचिकता’ समजावून सांगत नव्हते. केवळ एक जीवनातील शिस्त होती.

१. जुन्या ज्ञानासाठी नवीन नावे
भारतीय संस्कृतीतून एक प्रथा उदयाला आली आहे. कौटुंबिक सवयी, आध्यात्मिक शिस्त आणि सामुदायिक चालीरितींच्या माध्यमातून ते शतकानुशतके जतन केले गेले आहे. मग वाटेत कुठेतरी आधुनिक भारतीय त्याची कालबाह्य म्हणून खिल्ली उडवू लागतात. काही दशकांनंतर पाश्चिमात्य देशांनी त्याचा पुन्हा शोध लावला, त्याचे नाव पालटले, त्याचा अभ्यास केला, ‘पॅकेजिंग’ केले (बांधणी केली) आणि महागड्या शब्दसंग्रहात ते आम्हाला परत विकले. सूर्योदयापूर्वी उठणारी आजी ‘सर्केडियन ऑप्टिमायझेशन’ (नैसर्गिक जैविक घडाळ्याचे संतुलन राखणारी) बनते. श्वासोच्छ्वासाचे मार्गदर्शन करणारा योग शिक्षक ‘पॅरासिम्पेथेटिक ॲक्टिव्हेशन (विश्रांती आणि पचन प्रणाली सक्रीय करणारा) बनतो. ध्यान ‘माईंडफुलनेस’ (सजगता) बनते. साधे प्रारंभीचे जेवण ‘वेळेवर मर्यादित खाणे’ बनते. प्रतिबंधित आहार ‘चयापचय लवचिकता’ बनतो. उपवास ‘ऑटोफॅगी सक्रीय’ (शरिरातील खराब किंवा मृत पेशी नष्ट करून नवीन निरोगी पेशी सिद्ध करण्याची नैसर्गिक प्रक्रिया) बनतो. भावनिक स्थिरता ‘मज्जासंस्थेचे नियमन’ बनते आणि अनियमित झोप, राग, अतीभोजन अन् मानसिक हालचाली यांच्या विरुद्धची आयुर्वेदाची चेतावणी अचानक ‘कोर्टिसोल’ (ताणाविषयीचा संप्रेरक), जळजळ आणि तणाव जीवशास्त्राची ‘फॅशनेबल’ (अत्याधुनिक) भाषा म्हणून परत येतो. शब्दसंग्रह पालटतो. पांढरा कोट येतो. ‘पॉडकास्ट’ दिसते. सिलिकॉन व्हॅली हा कल स्वीकारते आणि अचानक अनेक सुशिक्षित भारतीय त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीने शतकानुशतके जे जगले, त्याचा आदर करू लागतात.

हा आधुनिक विज्ञानाच्या विरोधातील युक्तीवाद नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र हे मानवजातीच्या मोठ्या यशांपैकी एक आहे. प्रतिजैविके, शस्त्रक्रिया, ‘इमेजिंग’, आपत्कालीन काळजी, विविध लसी, अतीदक्षता सेवा आणि पुराव्यावर आधारित औषधशास्त्र यांनी कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले आहेत, तसेच हे प्रत्येक प्राचीन दाव्याचे आंधळे (खोटे) कौतुक करण्याचे आवाहन नाही. प्रत्येक पारंपरिक श्रद्धा आपोआप वैज्ञानिक होत नसते. प्रत्येक जुनी प्रथा योग्य आहे, असे म्हणणे योग्य नाही. पुरावा महत्त्वाचा आहे. सत्यता आणि चाचणी महत्त्वाची आहे; परंतु उलट अहंकारही तितकाच मूर्खपणाचा आहे. पाश्चिमात्य देशांनी त्याचे मोजमाप करेपर्यंत कशाचेही मूल्य नव्हते, असा समज असू नये. पहिले ‘स्मार्टवॉच’ (भ्रमणभाषसारख्या तांत्रिक सोयी असलेले घड्याळ) शोधण्यापूर्वी सहस्रो वर्षे संस्कृतींनी मानवी आरोग्याचे निरीक्षण केले. नियतकालिकांद्वारे नव्हे, तर शिस्तबद्ध जीवनातून अनेक अंतर्दृष्टी जतन केल्या. आजीला कदाचित् जैवरासायनिक मार्ग ठाऊक नसेल; परंतु तरीही तिला जीवनाची लय ठाऊक आहे.
प्राचीन ताल आणि आधुनिक विज्ञान
अनेक वर्षांनंतर ‘द एव्हिडन्स-मीट किल्स’ या माझ्या माहितीपटासाठी पोषण विज्ञानाविषयीच्या विचारात खोलवर बुडालेलो असतांना वरील आठवण मला नव्या जोमाने आठवली. मला नवी देहलीतील ‘एम्स्’ रुग्णालयातील डॉ. रिमा दादा यांच्या प्रयोगशाळेतून एक संशोधन मिळाले. या संशोधनामध्ये जैविक वृद्धत्वावर योगपद्धत आणि प्राणायाम यांच्या परिणामाचे परीक्षण केले गेले. प्राणायाम आणि ध्यान यांसारख्या पद्धतींसह योगावर आधारित जीवनशैली हस्तक्षेप ‘टेलोमीअर’ची (आपल्या पेशींमधील गुणसूत्रांच्या टोकाला असलेली ‘डी.एन्.ए.’ची एक संरक्षणात्मक रचना) लांबी, ‘टेलोमेरेस’ क्रिया, ‘ऑक्सिडेटिव्ह’ ताण, जळजळ आणि ‘डी.एन्.ए.’ दुरुस्तीवर कसा प्रभाव टाकू शकतात, हे तिच्या गटातील अभ्यासकांनी शोधून काढले आहे (संदर्भ : ‘टोलाहुनास ॲट अल., २०१७’; ‘शर्मा ॲट अल., २०२२’) माझ्यासाठी तो ओळखीचा क्षण होता. भारतियांच्या कोणत्या पिढ्यांनी त्यांचे घर, मंदिरे, आश्रम यांमध्ये आणि दैनंदिन दिनक्रमात शांतपणे काय केले, हे पडताळण्यासाठी आधुनिक आण्विक जीवशास्त्राची भाषा वापरणारी भारताची प्रमुख वैद्यकीय संस्था येथे होती. माझ्या आजीने कधीही ‘टेलोमेरे’ हा शब्द वापरला नसता. तिला पेशीय वृद्धत्वाची भाषा ठाऊक नव्हती; पण जिवंत अनुभवाद्वारे तिला काहीतरी सखोल ठाऊक होते. श्वास, अन्न, झोप, संयम, लय आणि आंतरिक शांतता हे जीवनाचे वेगळे विभाग नव्हते, तर त्यांनी एक शिस्त सिद्ध केली होती. भारतीय आरोग्य परंपरेत ही शांत प्रतिभा आहे. – श्री. मयांक जैन
२. योगाचे पुनरागमन
योग हे कदाचित् सर्वांत स्पष्ट उदाहरण आहे. अनेक दशकांपासून भारतातील इंग्रजी भाषिक अभिजात (समृद्ध) वर्गाच्या मोठ्या गटाने योगाला जुन्या पद्धतीचे, गूढ किंवा लाजिरवाणे म्हणून नाकारले. त्यानंतर अमेरिकन योग स्टुडिओ, प्रसिद्ध नामांकित व्यक्तींचे समर्थन, ‘न्यूरोसायन्स’ (मज्जासंस्था शास्त्र) अभ्यास, ‘मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एम्.आर्.आय.) पडताळणी आणि आंतरराष्ट्रीय स्वास्थ्याविषयीचे ‘ब्रँड’ (नामांकित उत्पादने) आले. अचानक योग जागतिक झाला. एकेकाळी ज्याकडे मागास म्हणून पाहिले जात होते, ते आता ‘प्रिमियम’ (उत्कृष्ट दर्जाचे) बनले. ध्यानधारणेने त्याच मार्गाचा अवलंब केला.
व्यावसायिक (कॉर्पाेरेट) जगाने थकवा शोधण्यापूर्वीच भारतीय परंपरांनी शांतता, लक्ष, श्वास आणि मानसिक शिस्त या कलांना संवर्धित केले होते. श्रीमंतांमध्ये तणाव हा महामारी बनला, तेव्हाच ‘माईंडफुलनेस’ (सजगता) हा शब्द लोकप्रिय झाला. जे अधिकारी एकेकाळी ध्यानावर हसले असतील, ते आता विलासी विश्रामगृहांमध्ये ध्यानाद्वारे शांती मिळवण्यासाठी चांगला मोबदला देतात.
३. जैन उपवासाची परंपरा
उपवासानेही त्याच मार्गाने प्रवास केला आहे. विशेषतः जैन परंपरांमध्ये संयम, लवकर खाणे, पाचक विश्रांती, साधेपणा आणि रात्री उशिरापर्यंत अन्न खाण्याचे टाळणे, ही तत्त्वे बर्याच काळापासून अंतर्भूत आहेत. आधुनिक स्वास्थ्य (वेलनेस) उद्योगात अनेक सुधारणांच्या आधीपासून जैन कुटुंबांना अल्प खाणे, लवकर खाणे आणि जागरूकतेने खाणे या नैतिक अन् शारीरिक शिस्तीची जाणीव होती. त्यानंतर शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील वर्ष २०१६ चा ‘नोबेल’ पुरस्कार आला. हा पुरस्कार जपानी शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांना ‘ऑटोफॅगी’, म्हणजे शरिराचे ‘सेल्युलर रिसायकलिंग (पेशींचा पुनर्वापर)’ आणि घर साफसफाईच्या प्रक्रियेशी संबंधित शोधांसाठी देण्यात आला (शरीरविज्ञान किंवा मेडिसीनमधील ‘नोबेल’ पारितोषिक, २०१६). आधुनिक विज्ञानाने जे आता सुंदरपणे स्पष्ट केले होते, ते साजरे केले; परंतु अनेक भारतीय घरांमध्ये या ज्ञानाची काही आवृत्ती पिढ्यान्पिढ्या दैनंदिन प्रथा म्हणून अस्तित्वात होती. यामुळे ‘नोबेल’ प्राप्तीचे महत्त्व अल्प होत नाही, तर यामुळे विज्ञान आणि परंपरा या दोन्हींविषयीची आपली कृतज्ञता अधिक दृढ होते. विज्ञान हे तंत्र स्पष्ट करते, तर परंपरेने अनेकदा वर्तन टिकवून ठेवले आहे.
४. पूर्ण नैसर्गिक वनस्पती आधारित आणि तेलमुक्त (होल फूड्स प्लांट बेसड् नो ऑईल) आहाराची मुळे भारतामध्ये !
माझा स्वतःचा प्रवासही असाच होता. ‘द एव्हिडन्स-मीट किल्स’ हा चित्रपट बनवतांना मी स्वतःला पोषण संशोधनात गुंतवले आणि हळूहळू संपूर्ण अन्न वनस्पतीवर आधारित कठोरतेने तेलविरहित जीवनशैलीकडे वळलो. ही फॅशन नव्हती, तर तो पुरावा होता. डॉ. मायकेल ग्रेगर, डॉ. जॉन मॅकडॉगल,
डॉ. कॅल्डवेल बी. एस्सेलस्टीन आणि डॉ. नील बर्नार्ड यांच्यासारख्या डॉक्टर अन् संशोधक यांचा, तसेच अतिरिक्त आहारातील चरबी, प्राण्यांची उत्पादने, ‘एंडोथेलियल डिसफंक्शन’ (एंडोथेलियम हे रक्तवाहिन्यांच्या आतील पातळ आवरणाला हानी पोचवते किंवा ते योग्यरित्या कार्य करत नाही.) आणि जुनाट आजार यांचा संबंध जोडणार्या वाढत्या कामाचा माझ्यावर प्रभाव होता.
इथे पुन्हा भारताकडे काही उत्तरे सरळ दृष्टीत लपलेली होती. ज्याला आपण आता संपूर्ण अन्न वनस्पतीवर आधारित आणि तेल नसलेले खाणे म्हणतो, ते अनेक लोकांच्या कल्पनेप्रमाणे भारतासाठी परकीय नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये नैसर्गिक वनस्पती आधारित आणि तेलमुक्त (होल फूड्स प्लांट बेसड् नो ऑईल) हे वाक्य सिद्ध होण्याच्या पुष्कळ आधीपासून अनेक भारतीय स्वयंपाकघरांनी आधीच तेलमुक्त, वाफवलेले, आंबवलेले आणि संपूर्ण अन्नपदार्थ परिपूर्ण केले होते.
(क्रमशः)
लेखक : श्री. मयांक जैन
(श्री. मयांक जैन हे माहितीपट निर्माते आणि ‘रूट स्टॉक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक आहेत. ‘क्रिमसन क्रिसेंट-द लास्ट क्वार्टर’ हा त्यांचा अलीकडील माहितीपट दक्षिण आशिया आणि युरोपमधील कट्टरतावादावरील २ दशकांच्या क्षेत्रीय कार्यावर आधारित आहे.)
नव्या ‘ग्रेट गेम’च्या (राजकीय डावपेचांच्या) केंद्रस्थानी बीजिंग
कर्नाटक येथील श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी धर्माभिमान जागृत होण्यासाठी भक्तांना केलेले मार्गदर्शन आणि ‘सनातन संस्थे’च्या साधकांविषयी काढलेले कौतुकाद्गार !
फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून कर्नाटक राज्यात झालेला प्रभावी धर्मप्रसार !
युवकांनी राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सज्ज व्हावे ! – सचिन कल्याणशेट्टी, आमदार, भाजप
सोमवती अमावास्येच्या भाविकांसाठी सजला जेजुरीतील ‘श्री खंडोबा गड’ !