अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अध्यात्मशास्त्रा’मध्ये ईश्वर, आत्मा यांसारख्या विषयांच्या संदर्भात तात्त्विक ज्ञान असते, तर ‘साधना’ म्हणजे मन, बुद्धी आणि अहं यांचा त्याग करून स्वस्वरूपाची ओळख करणे अथवा ईश्वरप्राप्ती करणे होय. थोडक्यात अध्यात्म हे तात्त्विक ज्ञान, तर साधना म्हणजे प्रत्यक्ष कृती होय ! त्यामुळे मनुष्यजन्माचे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याचे ध्येय साध्य करतांना अध्यात्म शिकण्याला १० टक्के, तर साधना करण्यास ९० टक्के महत्त्व आहे. त्यामुळेच भारतात आजवर अनेक निरक्षरही संत झालेले आहेत. त्यांनी कोणत्याच ग्रंथांचा अभ्यास केला नव्हता.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले