(ग्रूमिंग टोळी म्हणजे लहान मुली किंवा तरुणी यांनी जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणारे)

लंडन (ब्रिटन) – ब्रिटीश संसदेत अलीकडेच ‘ग्रूमिंग गँग’विषयी पुन्हा एकदा चर्चा चालू झाली आहे. ग्रेट यारमाउथचे खासदार रुपर्ट लोव यांनी संसदेत अनेक पीडित महिला आणि मुली यांच्या साक्षी वाचून दाखवल्या. या साक्षींमध्ये पोलीस अधिकार्याकडून बलात्कार आणि वांशिक आधारावर ब्रिटीश मुलींना लक्ष्य करण्यासारख्या अत्यंत वेदनादायक घटना समोर आल्या आहेत.
🚨 UK's Grooming Gangs Shame Exposed Again
British MP @RupertLowe10 highlighted the horrific grooming gang scandal in the UK, involving predominantly Pakistani-heritage men.
Survivors recounted horrific sexual abuse, police misconduct, institutional cover-ups, brutal violence,… pic.twitter.com/6S9U8LGnoj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2026
१. संसदेत लोव म्हणाले की, अनेक पीडितांनी अनेक वर्षे अत्याचार सहन केले; परंतु त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. या केवळ घटना नव्हत्या, तर एक संघटित गुन्हा होता, जो रोखण्यात अनेक संस्था अपयशी ठरल्या.
२. खासदार लोव यांनी या ग्रूमिंग गँग प्रकरणांची स्वतंत्र चौकशी केली. चौकशीत असे आढळून आले की, या बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये स्थानिक क्षेत्रांमधून अधिक पुरावे मिळाले आहेत.
३. लोव यांनी एका महिलेच्या साक्षीचा उल्लेख केला. या महिलेचे वडील इमाम (इस्लामचा अभ्यासक) होते. त्या महिलेने सांगितले की, अनेक वर्षांपर्यंत तिच्यावर ६०० ते ७०० वेगवेगळ्या पुरुषांनी बलात्कार केला. एका लहान मुलीने सांगितले की, तिच्या चेहर्यावर सिगारेटने चटके दिले गेले. एका अन्य पीडितेने सांगितले की, जेव्हा ती १२ ते १३ वर्षांची होती, तेव्हा तिच्या गुप्तांगात दारूची बाटली टाकून ती फोडण्यात आली होती. एका पीडितेने साक्ष दिली की, ग्रूमिंग गँग चालवणारे लोक वांशिक टिपण्याही करत असत. ते म्हणायचे, ‘गोर्या मुलींवरील संस्कार मुसलमान मुलींपेक्षा अल्प असतात.’
एका पीडितेने सांगितले की, इस्लामच्या सणांच्या वेळी त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत असत. विशेषतः ईदच्या आसपास अधिक मेजवान्या होत असत, तेव्हा त्यांना लक्ष्य केले जात असे, ज्यामध्ये मेजवानीमध्ये सहभागी होणारे इतर लोकही त्यांच्यावर बलात्कार करत असत.
धर्म आणि वांशिक भेदभावाच्या आधारावर केले लक्ष्य !
अनेक पीडितांनी शारीरिक हिंसाचारासमवेत मानसिक शोषणाचाही उल्लेख केला. एका पीडितेने सांगितले की, तिला ती ख्रिस्ती असल्यामुळे लक्ष्य केले गेले. शोषण करतांना ते लोक ‘क्रॉस’कडे पहात आणि म्हणत, ‘आता तुझा ईश्वर कुठे आहे ? तुझ्या ईश्वराने तुला सोडून दिले आहे का ?’
ब्रिटीश श्वेतवर्णीय मुली लक्ष्य !
ग्रूमिंग गँगने बहुधा ब्रिटीश मूळच्या गोर्या मुलींना लक्ष्य केले. पीडितांनी सांगितले की, वांशिक भेदभाव केला जात असे. माझ्यासमवेत ज्या मुली होत्या, त्या सर्व श्वेतवर्णीय (मूळच्या ब्रिटीश) होत्या.
अशाच एका अन्य पीडितेने सांगितले की, तिने १५ ते २० मुलींना कुत्र्यांच्या पिंजर्यात बंदिस्त केलेले पाहिले होते. या सर्व मूळच्या ब्रिटीश होत्या.
इतकेच नाही, तर या प्रकरणांमध्ये पोलीस अधिकार्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. एका पीडितेने सांगितले की, देशातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अनेक पोलीस अधिकार्यांनी बलात्कार केला.
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !