
सातारा, १६ जुलै (वार्ता.) – प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय पर्यटन विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे; मात्र वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याला साजेसे स्मारक व्हावे, अशी समस्त शिवभक्तांची इच्छा आहे. यासाठी अफझलखानाचा संरक्षक सय्यद बंडा याने छत्रपती शिवाजी महाराजांवर उगारलेला हात हवेतच तोडणारा वीर िजवाजी महाले यांचा शौर्याचा इतिहास दाखवणारे स्मारक व्हावे, अशी मागणी ‘हिंदु एकता आंदोलना’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘प्रतापगड विकास प्राधिकरणा’ची बैठक पार पडली. या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, भूषण गुरव, प्रतापगड विकास प्राधिकरण सदस्य विजय नायडू, अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘पर्यटन विभागाच्या जागेत बांधण्यात येणार्या या स्मारकासाठी १ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. हा निधी संमत केल्याविषयी छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे आम्ही आभारी आहोत. ज्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचा इतिहास म्हणजेच अफझलखानाचा कोथळा काढलेले शिल्प बसवण्यात येणार आहे, त्याप्रमाणेच वीर जिवाजी महाले यांचे शौर्याचा इतिहास दाखवणारे स्मारक हवे.’’
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा