पठाणकोट (पंजाब) येथील घटना

पठाणकोट (पंजाब) – येथे सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) हेरगिरी करणार्या बलजीत सिंह उपाख्य बिट्टू याला पोलिसांनी अटक केली. तो याद्वारे भारतीय सैन्य आणि अर्धसैनिक दल यांच्या हालचालींची माहिती पाकला देत होता.
Pathankot (Punjab): Man Arrested for Installing CCTV Cameras on National Highway and Supplying Information About Military Movements to Pakistan
Live footage from the cameras and other sensitive information were being sent to handlers based in Pakistan and abroad.
PC:… pic.twitter.com/bzlWGGtCPE— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 24, 2026
१. बलजित याने सुजानपूरजवळील राष्ट्रीय महामार्ग – ४४ वर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पूल क्रमांक ४ आणि ५ मधील दुकानांवर हे कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेर्यांचा वापर सैनिकी ताफ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. कॅमेर्यांमधून मिळणारे थेट चित्रीकरण आणि इतर संवेदनशील माहिती पाकिस्तान आणि परदेशात बसलेल्या हँडलर्सना (भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणारे लोक) पाठवली जात होती. त्याला दुबईत बसलेल्या एका व्यक्तीकडून आदेश यायचा आणि तो ही माहिती पुरवायचा. यासाठी त्याला ४० सहस्र रुपये मिळाले होते.
२. या प्रकरणात विक्रमजीत सिंह उपाख्य विक्का, बलविंदर सिंह उपाख्य विक्की आणि तरणप्रीत सिंह उपाख्य टन्नू या तिघांचाही हात असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आता या संपूर्ण जाळ्याचे सखोल अन्वेषण करत आहेत.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan