
१. यज्ञातील आचारशुद्धीचे महत्त्व !
काही वर्षांपूर्वी यज्ञासाठी बसणार्या यजमानांपैकी काही जण कृत्रिम (खोटे) अलंकार धारण करत असल्याचे दिसून आले. त्या वेळी गुरुदेवांनी सूचित केले की, ‘यज्ञासारख्या सात्त्विक क्रियेत खोटे अलंकार धारण केल्यास त्यातून सात्त्विक स्पंदने कशी प्रक्षेपित होतील ?’ या मार्गदर्शनातून असे स्पष्ट झाले की, यज्ञाच्या वेळी शुद्ध, नैसर्गिक आणि सात्त्विक आचार पाळणे आवश्यक आहे. त्यानंतर यज्ञासाठी बसतांना खरे अलंकारच धारण करण्याची शास्त्रसंमत पद्धत अंगीकारली गेली.
२. संकल्पातील व्यापकता !
यज्ञाचा संकल्प करतांना प्रारंभी तो केवळ सनातन संस्था आणि साधक यांच्यापुरता मर्यादित होता; परंतु गुरुदेवांनी त्याला व्यापक दिशा दिली. हिंदु राष्ट्र (रामराज्य) लवकरात लवकर स्थापन होऊ दे, तसेच येणार्या आपत्काळात संपूर्ण मानवजातीचे रक्षण होऊ दे, अशा समष्टीमूलक संकल्पांचा त्यांनी आग्रह धरला. यातून गुरुदेवांचे कार्य हे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, हे प्रकर्षाने जाणवते.
३. संकल्पातील उच्चारशुद्धता !

यज्ञाच्या प्रारंभी गुरुदेव स्वतः संकल्प करण्यासाठी उपस्थित रहात असत. त्या वेळी एखादा शब्द नीट ऐकू न आल्यास किंवा उच्चार अचूक न झाल्यास, ते तो पुन्हा म्हणण्यास सांगत. संकल्प अचूकपणे वाचून म्हणता यावा, यासाठी त्यांनी संकल्प लेखी स्वरूपात देण्यास पुरोहितांना सांगितले. यातून असे स्पष्ट होते की, संकल्पातील प्रत्येक शब्द, त्याचा उच्चार आणि शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे.
४. यज्ञसंस्कृतीचे जतन करण्यासाठी केलेले कार्य !
आजच्या काळात यज्ञसंस्कृतीचे महत्त्व अल्प होत असतांना तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गुरुदेवांनी मोठे कार्य हाती घेतले आहे. ऋषिमुनींनी दिलेले धर्मशास्त्र आणि त्यातील यज्ञपरंपरा सर्वांपर्यंत पोचावी, यासाठी त्यांनी सनातन पुरोहित पाठशाळेची स्थापना केली. या माध्यमातून वेदाध्ययन, यज्ञविधी आणि धर्मशिक्षण यांचे संवर्धन होत आहे.
५. धर्मशास्त्रानुसार आचरणाला प्राधान्य !
गुरुदेवांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतांना उपस्थितांना यज्ञ स्पष्टपणे पहाता येण्यासाठी प्रारंभी यज्ञकुंड उंच व्यासपिठावर बांधण्याचे नियोजन केले होते; परंतु गुरुदेवांनी स्पष्ट केले की, यज्ञकुंडाचा भूमीशी संपर्क असणे आवश्यक आहे; कारण त्यातूनच समाजाला योग्य लाभ होतो. यावरून असे स्पष्ट झाले की, दृश्य आकर्षकतेपेक्षा धर्मशास्त्रानुसार योग्य आचरण अधिक महत्त्वाचे आहे.
६. सर्वसमावेशक सहभागाची दृष्टी !
आश्रमात होणार्या यज्ञांचा लाभ सर्व साधकांना व्हावा, यासाठी गुरुदेवांनी विशेष नियोजन करून घेतले. यज्ञ प्रत्यक्ष पहाता यावा, यासाठी मोठ्या पडद्यावर त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. त्याचप्रमाणे जगभरातील साधकांनाही या यज्ञांचा लाभ व्हावा, यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यास त्यांनी सुचवले. यातून त्यांचा विस्तृत आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन दिसून येतो.
७. स्थूल आणि सूक्ष्म निरीक्षण
गुरुदेव स्वतः शारीरिकदृष्ट्या जमत नसतांनाही यज्ञस्थळी काही वेळ उपस्थित राहून निरीक्षण करत असत. ते केवळ बाह्य (स्थूल) गोष्टींकडेच नव्हे, तर सूक्ष्म स्तरावर होणार्या स्पंदनांकडेही लक्ष देत असत. आहुती एकत्र पडावी, यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच साधकांकडून निर्माण होणार्या शांती आणि आनंद यांच्या स्पंदनांचे निरीक्षण, या गोष्टी त्यांच्या सूक्ष्मदृष्टीचे द्योतक आहेत. तसेच लहानसहान आचारांतील त्रुटीदेखील त्यांनी लक्षात आणून दिल्या.
८. अनुभवलेखनाची प्रेरणा
यज्ञस्थळी लक्षात आलेली सूत्रे गुरुदेव त्वरित लिहून प्रसिद्ध करत असत, जेणेकरून सर्व साधकांना त्यातून शिकता येईल. त्याचप्रमाणे यज्ञात सहभागी असलेल्या साधकांना स्वतःला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेले लिहून ठेवण्यास सांगत. यातून साधकांमध्ये जागरूकता वाढून यज्ञाचे महत्त्व अधिक स्पष्ट होत होते.
९. निष्कर्ष
गुरुदेवांचा यज्ञसंस्कृतीकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा शास्त्रनिष्ठ, सूक्ष्म, व्यापक आणि समष्टी कल्याणकारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे यज्ञ ही केवळ पारंपरिक कृती न रहाता आध्यात्मिक उन्नती आणि धर्मसंवर्धनाचे प्रभावी माध्यम बनते.
– श्री. सिद्धेश करंदीकर, ढवळी, फोंडा, गोवा.
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !