विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा ! - हिंदुत्वनिष्ठांची मागणी
हिंदु जनजागृती समितीची अकोला येथे पत्रकार परिषद !

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील २० ‘घुसखोर’ लोकांची सूची प्रसारित करून स्वत:च्या आणि त्यांच्या पक्षाची वैचारिक दिवाळखोरी घोषित केली आहे. विठ्ठलभक्तीचा एक भाग असणार्या वारीला ८०० वर्षांपेक्षा अधिक काळ संतांचा वारसा लाभला आहे. त्यात अमुक लोक ‘घुसखोर’ आहेत, हे ठरवण्याचा अधिकार विलास लवांडे आणि त्यांच्या पक्षाला कुणी दिला ? या संदर्भात पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायाच्या वतीने विविध ह.भ.प. महाराजांनी एकत्र येऊन भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदु जनजागृती समितीसह सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना वारकरी संप्रदायाच्या या भूमिकेचे समर्थन करत आहेत. वारकरी संप्रदायावर करण्यात आलेले आरोप हे हिंदु संत, हिंदुत्व, धर्म यांच्यावरील आरोप आहेत. हे आरोप करून हिंदु समाजात दुही माजवण्याचा आणि संतपरंपरेचा अवमान करण्याच्या षड्यंत्रपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो, तसेच ‘विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा’, अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे करतो, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी मांडली. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. उदय महा, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा अध्यक्ष श्री. राजूभाऊ मंजुळेकर, पुरातन महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री. अरविंद देठे, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. उमेश महाराज, हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. श्रीराम पांडे उपस्थित होते.
‘अर्बन नक्षलवादी’, ‘अंधश्रद्धा निर्मूलनवाले’, ‘तथाकथित पुरोगामी’ या खर्या घुसखोरांवर मात्र मौन !
१. गेल्या काही वर्षांपासून वारीमध्ये नियोजनबद्धरित्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, ‘तथाकथित पुरोगामी’ यांच्या माध्यमातून शहरी नक्षलवाद्यांनी घुसखोरी केली आहे. ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे…’ यांसारखे अभंग चुकीच्या पद्धतीने मोडून-तोडून दाखवून वारीला ‘सेक्युलर’ (निधर्मी) बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
२. ‘संविधान दिंडी’ काढून जे वारकरी राज्यघटनेनुसारच वागतात, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र कधी ईदच्या दिवशी ‘संविधानिक ईद’ किंवा ख्रिसमसच्या काळात ‘संविधानिक ख्रिसमस’ असे उपक्रम राबवतांना ही मंडळी दिसतात का ? याउलट संतांच्या अभंगांचे स्वतःला हवे तसे अर्थ काढून हिंदु समाजाला दिशाभूल करणार्या मंडळींचा वारीत सुळसुळाट झाला आहे. ही खरी ‘घुसखोरी’ आहे. यावर शरद पवार गटाचे नेते सोयीस्करपणे मौन पाळतात.
हे ही वाचा →कां हे नष्ट करिती निंदा…?(म्हणे) ‘वारकरी संप्रदाय सनातन धर्मापासून वेगळा !’ – Vikas Lavande NCP |
३. वारी ही आमची संतपरंपरा आणि विठ्ठलभक्ती यांचा भाग आहे. वारी ‘सेक्युलर’ नसून ती ‘धार्मिक परंपरा’ आहे. या परंपरांवर आघात करण्यासाठी होत असलेले प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत. प्रत्येक वारकरी बांधव, ह.भ.प. यांसह प्रत्येक श्रद्धाळू हिंदूने यामध्ये पुढाकार घ्यायला हवा. हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संघटित व्हायला हवे.
४. आम्ही सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना वारकरी संप्रदायाच्या परंपरा अबाधित राखण्यासाठी, तसेच वारीतील शहरी नक्षलवाद्यांच्या घुसखोरीला रोखण्यासाठी कटीबद्ध आहोत. आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की, विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांना त्वरित अटक करावी.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !