Kerala Restaurant Controversy : ‘विशू’ उत्सवाच्या शुभेच्छा फलकावर श्रीकृष्णासमोर ‘चिकन मंदी’चे ताट दाखवले : रेस्टॉरंटच्या मुसलमान मालकाला अटक !

(‘विशू’ उत्सव म्हणजे मल्याळी बांधवांचे नवीन वर्ष)
(चिकन मंदी म्हणजे चिकन आणि भात )

(ही छायाचित्रे  देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

कोच्चि (केरळ) – केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील चेर्तला येथे ‘विशू’ उत्सवाच्या शुभेच्छा देणार्‍या फलकावर श्रीकृष्णाच्या चित्रासमोर ‘चिकन मंदी’चे (चिकन आणि भात) ताट दाखवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रेस्टॉरंटच्या मुसलमान मालकाला अटक केली आहे. मल्याळी बांधवांचे नवीन वर्ष असलेल्या ‘विशू’ निमित्त चेर्तला येथील मनोरमा चौकाजवळ असलेल्या ‘मेहर मंदी अँड ग्रिल्स’ या रेस्टॉरंटच्या नावाने सामाजिक माध्यमावर एक फलक प्रसारित करण्यात आला होता. या फलकावर श्रीकृष्णाच्या चित्रासमोर चिकन आणि मंदी (भात) असलेले ताट दाखवण्यात आले होते. या चित्रामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असा आरोप करत हिंदु संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. अधिवक्ता एम्.व्ही. बिजू यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रेस्टॉरंटचे मालक अरशद याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. विश्व हिंदु परिषदने रेस्टॉरंटच्या बाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

याविषयी वाद वाढल्यानंतर रेस्टॉरंटचे व्यवस्थापकीय भागीदार शमीम यांनी इंस्टाग्रामवर बिनशर्त क्षमायाचना केली आहे. केरळचे प्रख्यात मुसलमान नेते उस्ताद अन्सारी सुहरी यांनी फेसबुक व्हिडिओद्वारे या घटनेचा निषेध केला आहे. ‘तुम्ही विशूच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजेत असे नाही; पण शुभेच्छांच्या नावाखाली जातीय द्वेष पसरवू नका. अशा कृत्यांमुळे समाजात अशांतता निर्माण होते. काही चुका माणसाला जीवघेण्या ठरू शकतात, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमान हिंदूंविरुद्ध जिहाद करण्याची एकही संधी सोडत नाहीत, हेच यावरून लक्षात येते ! याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन देवतांचा अवमान करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी पत निर्माण केली पाहिजे !