Nashik Corporate Jihad : हिंजवडी (पुणे) येथे नाशिक येथील ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’ यांची देशव्यापी साखळी उघड करण्याची मागणी !

पुणे – नाशिक येथील बहुराष्ट्रीय आस्थापनात हिंदु महिला कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस भक्षणाची सक्ती आणि नमाजपठण यांचे जे प्रकार उघडकीस आले आहेत, त्यांमागील विखारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी. यामागील ‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चे सखोल अन्वेषण करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, या मागण्यांकरता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ एप्रिलच्या सायंकाळी ५.३० वाजता ‘हिंजवडी फेज १’ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

आंदोलन करतांना हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी

या वेळी धर्माभिमानी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. या वेळी याविषयावरील निवेदनांवर लोकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. स्वाक्षर्‍यांचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना देण्यात येणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितले.

आंदोलन करतांना हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी घोषणा देतांना

सहभागी मान्यवर

आंदोलनामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे पुणे जिल्हा समन्वयक श्री. सचिन घुले, सर्वश्री बाळासाहेब खानेकर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ समाज प्रबोधनकार श्री. सुशांत गाडे, ‘स्वा. सावरकर युवा विचार मंचा’चे श्री. दयानंद बंडगर, ‘राजे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. सुनील बेनगुडे, हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रशासनाने हे नराधम आणि त्यांना पाठीशी घालणारी व्यवस्था यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर हिंदु जनजागृती समिती समस्त हिंदु संघटनांच्या वतीने राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडेल, अशी चेतावणी समितीने या वेळी दिली आहे.

विविध घोषणा फलक !

‘नाशिक येथील बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये चालू असलेला ‘कॉर्पोरेट जिहाद’ बंद झालाच पाहिजे’

‘हिंदु महिलांच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या आस्थापनातील उच्चपदस्थांची चौकशी करा’

‘नाशिकमधे ७ आरोपी, तर अन्य शहरांत किती ?, हे शोधण्यासाठी या ‘लव्ह जिहाद रॅकेट’चे व्यापक अन्वेषण करा’

‘कॉर्पोरेट जिहाद’द्वारे हिंदु महिलांचे शोषण करणार्‍या अन् त्यांना पाठीशी घालणार्‍यांना त्वरित अटक करा’

असे विविध फलक घेऊन हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते.

आंदोलनातील प्रमुख मागण्या !

१. नाशिक येथील सदर आस्थापनातून ७ आरोपींना अटक झाली आहे. नाशिकमध्ये ७ सापडले, तर अन्य शहरांत किती असतील ? त्याचप्रमाणे पुणे येथील एका आस्थापनातसुद्धा असे घडत असल्याची चर्चा चालू आहे. याचीही चौकशी व्हावी.  

२. ज्या आस्थापनांमध्ये हिंदु महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे ‘धार्मिक दहशत’ निर्माण केली जाते, अशा आस्थापनांचा व्यवसाय परवाना रहित करून त्यांना टाळे ठोकण्यात यावे; तसेच राज्यातील सर्व आयटी आणि बहुराष्ट्रीय आस्थापने यांचे तात्काळ ‘विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभावविरोधी ऑडिट’ करण्याचा आदेश सरकारने द्यावा.

३. या आस्थापनात भरतीप्रक्रिया राबवतांना एखाद्या विशिष्ट समुदायाला किंवा विचारसरणीला झुकते माप दिले जाते का?  आणि त्या माध्यमातून हिंदु महिलांना लक्ष्य करण्याचे धोरण राबवले जाते का ?, यांचीही सखोल चौकशी व्हावी.

या आणि अशा स्वरूपाच्या अन्य मागण्या या वेळी करण्यात आल्या.

मान्यवरांची भाषणे

हिंदूंनो, जिहादी संकटाविरुद्ध जागृत व्हा ! – डॉ. अजित जगताप, पतंजली योग समिती 

डॉ अजित जगताप

जिहादी मानसिकता आता केवळ प्रत्यक्ष कृतीत नसून आपण पीत असलेले पाणी, अन्न, प्रवास आणि अगदी आपल्या हातातील ‘अँड्रॉइड फोन’ मधील तंत्रज्ञानाद्वारेही आपल्यावर प्रभाव पाडत आहे. ‘इंटरनेट’च्या माध्यमातून लोकांचे विचार आणि आवड ओळखून त्यांना विशिष्ट विज्ञापने अन् ‘प्रपोगंडा’च्या जाळ्यात अडकवण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत. या सर्व संकटांतून बाहेर पडण्यासाठी हिंदूंनी पूर्णपणे जागृत होणे आवश्यक आहे.

धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी हिंदूसंघटन आवश्यक ! –  सुशांत गाडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

प्रखर हिंदुत्वनिष्ठ, समाज प्रबोधनकार सुशांत गाडे

छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आदर्शांना स्मरून, हे आंदोलन केवळ नाशिकमधील ‘टी.सी.एस्.’ आस्थापनात हिंदु भगिनींवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी नसून, ते भविष्यातील भीषण संकटांना थोपवण्यासाठी आहे. नाशिकमध्ये हिंदु महिलांवर झालेली धर्मांतराची सक्ती, अत्याचार आणि त्यांना गोमांस खाऊ घालण्याचे झालेले प्रयत्न यांसारख्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून सतत घडत आहेत. त्यामुळे आता केवळ तात्पुरत्या आंदोलनांवर न थांबता, आपल्या धर्माच्या आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी हिंदूसंघटन करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

धर्मो रक्षति रक्षित:’ ! – सुनील बेनगुडे, संस्थापक, राजे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान

‘धर्मो रक्षति रक्षितः’ या वचनानुसार आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले आणि पर्यायाने देशाचे रक्षण करेल; परंतु आज नाशिकसारख्या ठिकाणी महिलांचे होणारे सार्वजनिक शोषण ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. सुशिक्षित महिलाही असुरक्षित असलेल्या या काळात नवीन पिढीला धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता असून राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी आणि झाशीच्या राणीसारख्या वीरांगनांचा वारसा सांगणार्‍या आपल्या देशात मुली आणि तरुण यांना जर स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान नसेल, तर अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत रहातील, म्हणूनच तरुण पिढीला संस्कारित करणे ही काळाची आवश्यकता आहे.

विशेष : श्री अश्विनजी आश्रम ऋषिकेश, उत्तराखंड येथील महाराजांनीही आंदोलन पाहिले आणि ते सहभागी झाले.

संपादकीय भूमिका

असे आंदोलन का करावे लागते ? अनेक बहुराष्ट्रीय आस्थापने स्वतःला ‘सर्वधर्मसमभावी’ मानतात; मात्र तिथे एकीकडे हिंदु कर्मचार्‍यांना सण साजरे करण्यास विरोध होतो, तर दुसरीकडे नमाजासाठी विशेष सवलती दिल्या जातात. हा भेदभाव म्हणजेच व्यावसायिक जिहादचा पाया आहे !