
नवी देहली – हिंदुद्वेषी महिला पत्रकार राणा अय्यूब यांनी हिंदूंच्या देवता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेली आक्षेपार्ह ट्वीट्स हटवण्यास ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अपयशी ठरल्याने त्याची भारतातील कायदेशीर सुरक्षा रहित केली जाऊ शकते, असे केंद्र सरकारने देहली उच्च न्यायालयात सांगितले.
Safe Harbour at Risk Over ‘Offensive’ Tweets
The Central Government has indicated that X Corp may lose its legal safe harbour protection for failing to remove tweets by Rana Ayyub.
The posts (2013–2017) target Shri Ram, Vinayak Damodar Savarkar and the Indian Army. The plea… https://t.co/T3guxkuDKj pic.twitter.com/s0scwvyANJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2026
१. केंद्र सरकार आणि देहली पोलीस यांनी न्यायालयाला कळवले की, न्यायालयीन आदेश आणि कायदेशीर नोटिसा मिळूनही ‘एक्स’ने आक्षेपार्ह लिखाण हटवले नाही. आयटी कायद्याच्या नियमांनुसार एकदा का सामाजिक माध्यमाला अशा बेकायदेशीर लिखाणाविषयी अधिकृत माहिती मिळाली की, तो हटवणे त्यांचे कर्तव्य असते. असे न केल्यास, आयटी कायद्याच्या कलम ७९(१) अंतर्गत मिळणारे संरक्षण काढून घेता येते.
२. हे प्रकरण वर्ष २०१३ ते २०१७ या काळात राणा अय्यूब यांनी केलेल्या काही ट्वीट्सशी (लिखाणाशी) संबंधित आहे. अधिवक्ता अमिता सचदेवा यांनी याविरोधात याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मे या दिवशी होणार आहे.
महिला पत्रकार राणा अय्यूब यांनी श्रीराम, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतीय सैन्य यांच्याविषयी केलेले आक्षेपार्ह ट्वीट्स !
देहली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी, ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावरील महिला पत्रकार राणा अय्यूब यांचे लिखाण अत्यंत अपमानास्पद, चिथावणीखोर आणि धर्मांध स्वरूपाचे आहे’ असे सांगत देहली पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला. अय्यूब यांचे आक्षेपार्ह ट्वीट्स पुढे दिले आहेत –
१. वर्ष २०१३ मधील अय्यूब यांच्या ट्वीटमध्ये लिहिले होते, ‘रावणाने सीतेला स्पर्शही केला नाही, जरी तो तसे करू शकत होता. राम सीतेसाठी उभे राहिले नाहीत, जरी त्यांनी तसे करणे आवश्यक होते.
२. ऑक्टोबर २०१४ मध्ये अय्यूब यांनी अली सरदार जाफरी यांचा एक शेर उधृत केला, ज्यामध्ये लिहिले होते, ‘गरीब सीतेच्या घरावर किती काळ रावणाचे राज्य रहाणार, द्रौपदीचे वस्त्र तिच्या अंगावरून किती काळ हिसकावले जाणार ?’
३. वर्ष २०१५ मध्ये अय्यूब यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक ट्वीट केले होते. त्यामध्ये म्हटले होते, ‘तर वीर सावरकरांनी हिंदुत्व राष्ट्रवादाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून बलात्काराचे समर्थन केले होते.’
४. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आणखी एका ट्वीटमध्ये अय्यूब यांनी म्हटले, ‘मी नथुराम गोडसे यांनी सावरकरांविषयी लिहिलेला तपशील वाचत होते आणि विचार करत होते की, आपण या आतंकवाद समर्थकाचा सन्मान करणे चालू ठेवावे का ?’
५. वर्ष २०१६ मध्ये अय्यूब यांनी एक ट्वीट केले होते, ज्यामध्ये एका मुलाचे छायाचित्र होते. त्याच्या चेहर्यावर जखमांचे निशाण होते. त्या ट्वीटमध्ये लिहिले होते, ‘प्रिय भारतीय सेना, माझा अंदाज आहे की, हा लहान मुलगा भारताच्या सार्वभौमत्वासाठी इतका मोठा धोका ठरला असेल की, याला आयुष्यभरासाठी आंधळे करण्यात आले.’
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था