मध्यप्रदेश उच्च न्यायालयात धार भोजशाळा प्रकरणाची दैनंदिन सुनावणी चालू

इंदूर (मध्यप्रदेश) – राज्याच्या उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठात धार भोजशाळा प्रकरणावर दैनंदिन सुनावणी चालू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीसाठी इंदूर खंडपिठाकडे पाठवल्यानंतर सर्व पक्षांनी युक्तीवाद करण्यास आरंभ केला आहे. हिंदु पक्षाकडून अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी न्यायालयासमोर भोजशाळेचा हिंदु कालखंडातील इतिहास आणि परंपरा यांसंदर्भात युक्तीवाद मांडला. त्यांनी १० व्या आणि ११ व्या शतकांचा उल्लेख करत संस्कृतमधील ऐतिहासिक संदर्भ सादर केले, तसेच श्रीराममंदिर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही उल्लेख करण्यात आला. ही संपत्ती वक्फ बोर्डाची नसल्याचे त्यांनी सांगितले आणि वक्फच्या संदर्भातील वर्ष २०२५ मधील नव्या आदेशाचाही उल्लेख केला.
Hindu side presents historical evidence from the 10th and 11th centuries
Daily hearing underway in Dhar Bhojshala case at Madhya Pradesh High Court
Read more:https://t.co/dDa6tjfL9Q https://t.co/ITnz4dyfSP pic.twitter.com/nk1zYdteIJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 10, 2026
१. हिंदु पक्षाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सर्वेक्षण अहवालाचा दाखला देत म्हटले की, प्राचीन काळापासून भोजशाळा हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. सर्वेक्षणातील निष्कर्ष गंभीरतेने घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले.
२. सुनावणीच्या वेळी भोज राजवटीचा उल्लेखही करण्यात आला, तसेच इस्लामी आक्रमकांनी केलेली हानी आणि नंतर ब्रिटीश काळात झालेले पालट यांचाही संदर्भ देण्यात आला. भोजशाळेचे ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व अधोरेखित करत विविध पुरावे सादर करण्यात आले. हा परिसर १० व्या आणि ११ व्या शतकापासून ‘संरक्षित वारसा’ म्हणून ओळखला जात असल्याचेही सांगण्यात आले.
३. अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी वर्ष १९३५ मधील एका फलकाचा उल्लेख करत म्हटले की, त्या काळानंतर परिसरात वाद निर्माण झाले आणि हा परिसर बेकायदेशीर पद्धतीने कह्यात घेण्यास आरंभ झाला. भारतीय पुरातत्व विभागाचा अहवाल, स्तंभांवरील कोरीवकाम आणि ऐतिहासिक नोंदी यांच्या आधारे त्यांनी न्यायालयासमोर त्यांची बाजू मांडली.
काय प्रकरण आहे ?
धार येथील भोजशाळेत श्री सरस्वतीदेवीचे मंदिर होते. मुसलमान आक्रमकांनी ते पाडून तेथे अतिक्रमण केले. मुसलमान पक्षाचा दावा आहे की, ११ व्या शतकातील हे स्थळ कमाल मौला मशीद आहे. सध्या हा परिसर भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार येथे उत्खनन आणि सर्वेक्षण करण्यात आले होते. या वेळी विविध मूर्ती सापडल्याची माहिती हिंदु पक्षकारांनी दिली आहे.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले