पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना देवतांची तत्त्वे एरव्हीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत होतात !

४ एप्रिल या दिवशी अमावास्या, पौर्णिमा आणि अन्य दिवशी श्रीकृष्ण, श्री दुर्गादेवी, श्री लक्ष्मी, शिव आणि मारुति या देवतांच्या चित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण पाहिले. आजच्या भागात या सूक्ष्म परीक्षणाचा सारांश आणि देवतांच्या चित्रांचे लोलकाने केलेले परीक्षण पाहू.

(भाग ४ )

भाग ३  वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025863.html

(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

२. सारांश

अ. ‘पौर्णिमा आणि अमावास्या या दोन्ही तिथींना वाईट शक्तींच्या त्रासाचा जोर वाढत असल्याने त्याविरुद्ध लढण्यासाठी त्या दोन्ही दिवशी प्रत्येक देवतेतील तत्त्व वाढते’, हे या संशोधनातून लक्षात आले.

आ. पौर्णिमेपेक्षा अमावास्येला वाईट शक्तींच्या त्रासाचा जोर अधिक असल्याने त्या दिवशी देवतेतील तत्त्वही अधिक प्रमाणात वाढलेले असते.

इ. ‘पौर्णिमेला देवतेतील मारक तत्त्व वाढते’, हे लक्षात आले.

ई. ‘अमावास्येला देवतेतील निर्गुण तत्त्व वाढते’, हेही लक्षात आले. अमावास्येला अधिक प्रमाणात असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी देवता निर्गुण स्तरावर लढतात.

उ. ‘अमावास्येला अधिकतर देवतांचे तारक तत्त्व वाढलेले असते; पण शिव ही देवता आकाशतत्त्वाशी संबंधित असूनही पौर्णिमा आणि अमावास्या या दोन्ही तिथींना तिचे मारक तत्त्व वाढते’, असे लक्षात आले. याचे कारण म्हणजे शिव ही लयाशी संबंधित देवता असल्याने तिचे मारक तत्त्व वाढते.

लोलक

३. लोलकाने केलेले परीक्षण

टीप : या दिवशी देवतांच्या चित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

वरील सारणीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

अ. अन्य दिवसापेक्षा पौर्णिमेला देवतांच्या चित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आढळली. याचा अर्थ पौर्णिमेच्या दिवशी वाईट शक्तींशी लढण्यासाठी देवतांनी आपले तत्त्व वाढवले.

आ. पौर्णिमेच्या दिवशी देवतांच्या चित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. याचा अर्थ पौर्णिमेच्या दिवशी वाईट शक्ती देवतांच्या चित्रांवर त्रासदायक आवरण आणू शकल्या नाहीत.

इ. पौर्णिमेच्या दिवसापेक्षा अमावास्येच्या दिवशी देवतांच्या चित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आढळली. याला अपवाद केवळ मारुति होता. अमावास्येच्या दिवशी वाढलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी देवतांनी आपले तत्त्व आणखी वाढवले.

ई. अमावास्येच्या दिवशी सर्वच देवतांच्या चित्रांवर अगदी क्षुल्लक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली. त्या दिवशी देवतांच्या चित्रांच्या मिळालेल्या ५ सहस्र ते ८ सहस्र मीटर सकारात्मक ऊर्जेच्या तुलनेत त्या चित्रांची आढळलेली ११ ते १४ मीटर नकारात्मक ऊर्जा नगण्यच म्हणावी लागेल.

४. निष्कर्ष

सूक्ष्म परीक्षण आणि लोलक परीक्षण यांद्वारे देवतांच्या चित्रांचे पौर्णिमा अन् अमावास्या या तिथींना संशोधन करण्यात आले. त्यातून असे लक्षात आले की, पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना वाढलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी देवता आपले तत्त्व वाढवतात अन् वाईट शक्तींचा त्रास अल्प करतात. अशा प्रकारे त्या तिथींना देवता आपले तत्त्व वाढवून साधकांना साधनेमध्ये साहाय्य करत असतात. देवता आपल्याला करत असलेले हे साहाय्य आपल्याला कळत नाही. पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना आध्यात्मिक त्रासाशी लढतांना साधकांनी मनात देवतांप्रती कृतज्ञताभाव ठेवला पाहिजे. या कृतज्ञताभावामुळे साधकांना देवतांचे साहाय्य आणखी अधिक प्रमाणात मिळेल. या संशोधनातून ‘देवता साधकांसाठी सूक्ष्मातून कसे कार्य करत असतात’, हे लक्षात येते.’

(समाप्त)

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.३.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.