३ एप्रिल या दिवशी अमावास्या, पौर्णिमा आणि अन्य दिवशी देवतांच्या दत्त आणि श्रीराम यांच्या चित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण पाहिले. आज पुढील भाग पाहू.
(भाग ३ )
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025533.html

१. अमावास्या, पौर्णिमा आणि अन्य दिवशी देवतांच्या चित्रांचे केलेले सूक्ष्म परीक्षण
१ आ. श्रीकृष्ण, श्री दुर्गादेवी आणि श्री लक्ष्मी या देवता

१ आ १. श्रीकृष्ण
१ आ १ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी श्रीकृष्णातील सगुण तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. याला अनुसरून त्याच्यातील शक्तीची स्पंदने ५ टक्क्यांनी वाढली. तसेच पौर्णिमेच्या दिवशी त्याच्यातील मारक तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी श्रीकृष्णातील सगुण तत्त्व आणि मारक तत्त्व वाढते’, असे लक्षात आले.
१ आ १ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : अमावास्येच्या दिवशी श्रीकृष्णातील निर्गुण तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. त्या दिवशी श्रीकृष्णातील शक्ती आणि आनंद यांची स्पंदने प्रत्येकी १० टक्क्यांनी वाढली; मात्र श्रीकृष्णातील तारक आणि मारक तत्त्व तेवढेच राहिले. याचा अर्थ ‘अमावास्येच्या दिवशी असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी श्रीकृष्णातील निर्गुण तत्त्व वाढते’, हे लक्षात आले.
१ आ २. श्री दुर्गादेवी
१ आ २ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी श्री दुर्गादेवीतील सगुण तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. याला अनुसरून तिच्यातील शक्ती आणि भाव यांची स्पंदने वाढली. तसेच तिच्यातील मारक तत्त्वही ५ टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी वाढलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी श्री दुर्गादेवीतील सगुण तत्त्व आणि मारक तत्त्व वाढते’, असे लक्षात आले.
१ आ २ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी श्री दुर्गादेवीतील सगुण तत्त्व वाढले होते, तर अमावास्येच्या दिवशी तिचे निर्गुण तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. याला अनुसरून देवीतील शक्तीची स्पंदने अल्प होऊन भाव आणि आनंद यांची स्पंदने वाढली. अमावास्येच्या दिवशी देवीतील तारक तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ‘अमावास्येच्या दिवशी वाईट शक्तींशी लढण्यासाठी देवीने आपले निर्गुण तत्त्व आणि तारक तत्त्व वाढवले’, हे लक्षात आले.
१ आ ३. श्री लक्ष्मी
१ आ ३ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी श्री लक्ष्मीच्या चित्रातील सगुण तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. याला अनुसरून लक्ष्मीतील शक्तीची स्पंदने १५ टक्क्यांनी वाढली. तसेच तिच्यातील मारक तत्त्वही १० टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीतील सगुण तत्त्व आणि मारक तत्त्व वाढते’, हे लक्षात आले.
१ आ ३ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : अमावास्येच्या दिवशी श्री लक्ष्मीच्या चित्रातील निर्गुण तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. त्या वेळी तिच्यातील चैतन्य ५ टक्क्यांनी वाढले, तसेच तिच्यातील तारक तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी श्री लक्ष्मीतील सगुण तत्त्व आणि मारक तत्त्व वाढते, तर अमावास्येच्या दिवशी अधिक प्रमाणात असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी श्री लक्ष्मीतील निर्गुण तत्त्व आणि तारक तत्त्व वाढते’, असे लक्षात आले.
१ इ. मारुति आणि शिव

१ इ १. मारुति

१ इ १ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी मारुतीतील निर्गुण तत्त्व, तसेच मारक तत्त्वही ५ टक्क्यांनी वाढले. तेव्हा याला अनुसरून त्याच्यातील आनंद आणि शक्ती यांचीही स्पंदने ५ टक्क्यांनी वाढली. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी मारुतीतील निर्गुण तत्त्व, तसेच मारक तत्त्व वाढते’, असे लक्षात येते.
१ इ १ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : अमावास्येच्या दिवशी मारुतीतील निर्गुण तत्त्व १० टक्क्यांनी वाढले; पण या वेळी त्याच्यातील मारक तत्त्व न वाढता तारक तत्त्व ५ टक्क्यांनी वाढले. याला अनुसरून मारुतीतील केवळ आनंदाची स्पंदने १० टक्क्यांनी वाढली. याचा अर्थ ‘अमावास्येच्या दिवशी पौर्णिमेच्या तुलनेत अधिक प्रमाणात असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी मारुतीतील निर्गुण तत्त्व आणि तारक तत्त्व वाढते’, असे लक्षात आले. मारक तत्त्वापेक्षा तारक तत्त्व अधिक परिणामकारक असते.
१ इ २. शिव

१ इ २ अ. अन्य दिवस आणि पौर्णिमा यांची तुलना : पौर्णिमेच्या दिवशी शिवातील निर्गुण तत्त्व, तसेच मारक तत्त्वही ५ टक्क्यांनी वाढले. त्या वेळी शिवातील शांतीची स्पंदने ५ टक्क्यांनी वाढली. याचा अर्थ ‘पौर्णिमेच्या दिवशी असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी शिवातील निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व वाढते’, असे लक्षात आले.
१ इ २ आ. अन्य दिवस आणि अमावास्या यांची तुलना : अमावास्येच्या दिवशी शिवातील निर्गुण तत्त्व १५ टक्क्यांनी, तर मारक तत्त्व १० टक्क्यांनी वाढले. त्या वेळी शिवातील शांतीची स्पंदने १० टक्क्यांनी वाढली. याचा अर्थ ‘अमावास्येच्या दिवशी पौर्णिमेच्या तुलनेत अधिक प्रमाणात असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी शिवातील निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व अधिक प्रमाणात वाढते’, असे लक्षात आले.
(क्रमश:)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.३.२०२६)
भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1026622.html
|
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
वैचारिक प्रगल्भता आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या दैवी बालिका कु. आराधना धाटकर अन् कु. शर्वरी कानस्कर !