Murshidabad Violence : कोलकाता पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवरच नोंदवला गुन्हा

श्रीरामनवमीच्या दिवशी मुर्शिदाबाद येथे हिंदूंवर झालेल्या आक्रमणाचा व्हिडिओ प्रसारित केल्याचे प्रकरण

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सौरिश मुखर्जी (डावीकडे) कोलकाता पोलीस (उजवीकडे)

मुर्शिदाबाद (बंगाल) – मुर्शिदाबाद आणि पुरुलिया येथे श्रीरामनवमीच्या दिवशी, म्हणजेच २७ मार्च या दिवशी हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे झाली. याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारितही झाले.

आक्रमण करणार्‍या मुसलमानांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी व्हिडिओ प्रसारित करणार्‍या हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा नोंदवला. हा गुन्हा कोलकाता येथील सायबर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. संबंधित खात्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२), ३५३(१)(ब) आणि १९६(१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या आक्रमणावर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सौरिश मुखर्जी यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की, मुर्शिदाबाद येथून गंभीर हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर पुन्हा आक्रमण झाल्याचे सांगितले जात आहे. या मुसलमानबहुल जिल्ह्यात वारंवार निर्माण होणारा तणाव अनेक प्रश्न निर्माण करतो. दायित्व कुणाचे आणि कायदा-सुव्यवस्था कुठे आहे ? यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारचे शेवटचे दिवस भरले आहेत, असेच आता हिंदूंना वाटत आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीत कृतीशील प्रयत्न करणे आवश्यक आहे !